Nashik News : वडापाव विक्रेत्याने रचले ‘बन गया मंदिर राम का’ गीत; चित्रबद्ध केलेले गाणे व्हायरल

अयोध्येत श्रीराम मंदिर पुजनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी उत्सुकता वाढीस लागत आहे.
Ram Mandir
Ram Mandiresakal
Updated on

Nashik News : अयोध्येत श्रीराम मंदिर पुजनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी उत्सुकता वाढीस लागत आहे. भक्तगणही तयारीला लागले आहेत.

सिडको परिसरातील पवननगर भागामध्ये वडापावचा व्यवसाय करणाऱ्या कैलास सांबरे यांनी ‘बन गया मंदिर राम का’, हे गाणे लिहिले आणि मित्रांच्या सांगण्यावरून त्यांनी या गाण्याला संगीत देऊन मुलगा देव सांबरे याला घेऊन हे गाणे चित्रितही केले आहे. (song Ban Gaya Mandir Ram Ka was composed by vada pav seller in nashik news)

Ram Mandir
Nashik News : मनमाडला वाहतूक कोंडीचा त्रास; नगिना मशिदीजवळ तयार झाला ब्लॅक स्पॉट

त्यांच्या गाण्याची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.यासंदर्भात त्यांनी सांगितले की, खरे तर वडापावचे काम करताना आपल्या गायनाची, लेखनाची आवड मागे पडली होती. परंतु अयोध्येतील राम बांधून पूर्ण झाले, या आनंदाच्या भरात कैलास यांनी हे गीत लिहून त्याचे चित्रीकरण करून घेतले.

या गीताला एक लाखांहून अधिक लोकांनी यू-ट्यूबवर पाहिले आहे. विशेष म्हणजे प्रचंड व्हायरल झालेले हे गीत सर्व लोकांच्या पसंतीस उतरत आहे. कुटुंबाच्या आवडीनिवडी पूर्ण करता करता आपली आवड कधी मागे पड़ते हे कळत नाही. तरीही सांबरे यांनी आपली सुप्त कला या गीताद्वारे सर्व जगाला दाखवून दिली आहे.

आपली उपजत कला जोपासली की जगही आपल्याला डोक्यावर घेते, हेच या गीताला मिळालेल्या पसंतीवरून समजते. आता लवकरच पुन्हा एकदा ‘जपू सदा मै एक ही नाम’ हे गीत घेऊन कैलास सांबरे व देव सांबरे हे सर्वांच्या सेवेत हजर होणार आहे. या गाण्यालाही सर्व लोकांकडून भरभरून प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा कैलास सांबरे यांनी व्यक्त केली आहे.

Ram Mandir
Nashik News : ‘सोलर’ प्रकल्पाने बेरोजगाराची कुऱ्हाड; एकलहरे केंद्राला 250 वॉटचे 2 संच द्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.