Nashik News : मनपाच्या सोनोग्राफी सेंटरमुळे खासगीवाल्यांना ‘पोटदुखी’; तक्रारींच्या आडून बंद पाडण्याचे उद्योग

MRI-Machine
MRI-Machineesakal
Updated on

Nashik News : कोरोनाकाळात गरीब रुग्णांसह त्यानंतरही खासगी सेंटरपेक्षा अगदी कमी दरात सोनोग्राफी होत असताना महापालिकेच्या नाशिक रोड येथील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरबाबत गेल्या काही महिन्यात तक्रारी वाढल्या आहेत.

परंतु या तक्रारींमागे सेंटर सुव्यवस्थित चालु ठेवण्यापेक्षा बंद पाडण्याचेच उद्योग असल्याची बाब समोर येत आहे.

दीड वर्षात सात हजार सोनोग्राफी करणारे अत्याधुनिक सेंटर परिसरातील खासगी रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन बंद पाडण्यास कारणीभूत ठरत असल्यानेच महापालिकेचे सेंटर पोटदुखी ठरत असल्याचे बोलले जात आहे. (Sonography center of municipality causes closure of private sonography machine nashik news)

२०१४-१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने महापालिकेच्या रुग्णालयात सीटी स्कॅन व एमआरआय मशिन खरेदीसाठी जवळपास अठरा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. खासगी रुग्णालयांमधील सीटी स्कॅन व एमआरआय चाचण्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने महापालिकेच्या बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मशिन खरेदी करण्याचा निर्णय त्या वेळी घेण्यात आला.

सप्टेंबर २०१९ मध्ये सीटी स्कॅन व एमआरआय मशिन चालविण्यासाठी पुरवठादाराला कार्यादेश देण्यात आले. त्यानुसार बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मशिन बसविले. कोविडकाळात रुग्णांच्या एचआरसीटी चाचणीकरिता यंत्र कार्यान्वित करण्यात आले. हजारो रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळाल्याने त्यांचे जीव वाचले. त्यानंतर २०२१ मध्ये तांत्रिक मनुष्यबळाचा अभाव असल्याने स्टार इमॅजिन संस्थेमार्फत सेंटर चालविले जाते.

नेमकी पोटदुखी कोणाला?

स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात खासगी वैद्यकीय संस्थापेक्षा जवळपास ७५ टक्के कमी दर असल्याने एमआरआय व सीटी स्कॅनसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मागील अडीच वर्षात दररोज सीटी स्कॅनचे सरासरी सात ते दहा, तर एमआरआयच्या २० ते २५ स्कॅनिंग येथे होतात. आतापर्यंत १७०५ सीटी स्कॅन, तर चार हजार ९९१ एमआरआय झाले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MRI-Machine
Nashik District Collector : ‘माझी माती, माझा देश’ अभियान आजपासून : जिल्हाधिकारी जलज शर्मा

रुग्णांचा प्रतिसाद मिळत असल्याने चोवीस तास सेंटर सुरू राहते. तर तीन ते चार तास वेटिंग आहे. कमी दरामुळे सेंटरमध्ये गर्दी होत असल्याने खासगी व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यातूनच एमआरआय व सीटी स्कॅन सुविधेबद्दल तक्रारी वाढल्या असून, थेट शासन दरबारी तक्रारी पोचत असल्याने यामागे सेंटर बंद पाडण्याचेच उद्योग असल्याचे बोलले जात आहे.

एमआरआय व सीटी स्कॅनचे असे आहेत दर

चाचणीचा प्रकार महापालिकेचे प्रस्तावित दर (रुपयात)

सीटी स्कॅन ब्रेन- ८००

सीटी स्कॅन स्पाईन- १४०० ते १७००

सीटी स्कॅन नेक, फेस- १४०० ते १७००

सीटी स्कॅन चेस्ट- ८००

सीटी स्कॅन अ‍ॅबडोमेन- २२०० ते ४५००

एमआरआय ब्रेन- ८००

एमआरआय जॉइंट- २३५०

एमआरआय, फेस,नेक,चेस्ट- १४०० ते १७००

एमआरआय, युरोग्राफी- २,३५०

एमआरआय, अ‍ॅबडोमेन- २,३५०

MRI-Machine
Tribal Day 2023 : बालचित्रकार प्रांजलीकडून कलेतून अस्मितेचा जागर; अप्रतिम चित्रे रेखाटत क्रांतिकारकांना आदरांजली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.