Nashik News: गोराणेतील स्मशानभूमीचा प्रश्‍न मार्गी लावा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर अंत्यसंस्कार; ग्रामपंचायतीचा इशारा

बागलाण तालुक्यातील गोराणे येथे गेल्या अनेक वर्षांपासून गावपातळीवर स्मशानभूमीचा प्रश्‍न भिजत आहे
Sort out cremation issue in Gorane otherwise cremation in front of Tehsil office Gram Panchayat warning
Sort out cremation issue in Gorane otherwise cremation in front of Tehsil office Gram Panchayat warningesakal
Updated on

अंबासन (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील गोराणे येथे गेल्या अनेक वर्षांपासून गावपातळीवर स्मशानभूमीचा प्रश्‍न भिजत आहे.

यामुळे गेल्या तीस वर्षांपासून ग्रामस्थांना उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत असल्याने ग्रामपंचायतीच्या हक्काच्या जागेवरील स्मशानभूमीला अडथळा निर्माण करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी नुकतेच तहसीलदार कैलास चावडे यांना ग्रामपंचायतीमार्फत निवेदन देण्यात आले. (Sort out cremation issue in Gorane otherwise cremation in front of Tehsil office Gram Panchayat warning Nashik News)

ग्रामपंचायत प्रशासनाकडून निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागील साधारण तीस वर्षापर्वी सरपंच यांनी गावासाठी स्मशानभूमी नसल्याने गावानजीक असलेल्या नाल्याजवळ एक गुंठा जागा ग्रामपंचायतीच्या नावाने दान केल्याचे म्हटले आहे.

त्यावेळी स्मशानभूमीचे बांधकाम केले दरम्यान तेव्हा संबंधितांकडून कुठलीही हरकत किंवा विरोध झाला नाही. साधारण दहा वर्ष त्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होत होते.

दहा वर्षानंतर संबंधितांकडून बांधकाम झालेली स्मशानभूमी चुकीच्या जागेवर बांधकाम झाले आहे आणि आम्ही तिथे अंत्यसंस्कार करू देणार नाही असे म्हणत त्या दिवसापासून त्यांनी स्मशानभूमी बंद पाडून टाकली व गावाला पुन्हा स्मशानभूमीचा प्रश्न निर्माण झाला.

Sort out cremation issue in Gorane otherwise cremation in front of Tehsil office Gram Panchayat warning
Dr. Rajendra Gavai : डॉ. राजेंद्र गवई यांचे ‘एकला चलो रे’; महाविकास आघाडीला दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

गोराणे गावाला मागील वीस वर्षापासून लोकांना सदर गटामध्ये स्मशानभूमीचे बांधकाम झालेले असतांना सुद्धा किरकोळ कारणामुळे उघड्यावर अंत्यविधी करावा लागत आहे.

याबाबत नुकतेच तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन सादर करण्यात आला असून याबाबत तहसीलदार काय कारवाई करतात याकडे गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

"स्मशानभूमीबाबत जायखेडा पोलिसांचे दुर्लक्ष आहे. गुन्हा दाखल करण्यातही टाळाटाळ करीत आहेत तर तहसीलदार कार्यालयातही पाहिजे ती दखल घेतली नाही. गावातील स्मशानभूमीचा प्रश्‍न मार्गी लागला नाही तर नाईलाजास्तव पुढील अंत्यसंस्कार थेट तहसील कार्यालयासमोर केले जातील. "- दिनेश देसले, सरपंच गोराणे.

"ग्रामस्थांना हक्काची स्मशानभूमी असतांनाही उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत असेल तर खुपच लाजिरवाणी बाब आहे. "- यशवंत देसले, ग्रामपंचायत सदस्य गोराणे

Sort out cremation issue in Gorane otherwise cremation in front of Tehsil office Gram Panchayat warning
Mumbai News : ठाणे-मुलुंड दरम्यान शनिवारी रात्री ट्रॅफिक ब्लॉक! लोकल, मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.