नाशिक : विभागामध्ये खरीपाच्या 19 टक्के पेरण्या

farmer sowing
farmer sowingesakal
Updated on

नाशिक : मॉन्सूनच्या (monsoon) बिघडलेल्या वेळापत्रकामुळे नाशिक विभागामध्ये आजअखेर १८.५३ टक्के खरीपाच्या (Kharif) पेरण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. विभागात सर्वाधिक ३५.४७ टक्के पेरण्या धुळे जिल्ह्यात, त्याखालोखाल २०.८४ टक्के जळगाव, तर १०.५० टक्के नंदुरबारमध्ये, ८.८३ टक्के नाशिक जिल्ह्यात पेरण्या झाल्या आहेत. पाऊस असमाधानकारक झाल्याने राज्यभरात खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. राज्यातील धरणांमध्ये २१.८२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यात नाशिक विभागातील २०.०२ टक्के जलसाठ्याचा समावेश आहे. (Sowing 19 percent of kharif in nashik division Nashik News)

कापसाची ३४ टक्के लागवड

नाशिक विभागात आतापर्यंत ३७.७४ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील २८.४१, धुळ्यातील ५९.७५, नंदूरबारमधील २७.७७, जळगावमधील ३०.६४ टक्के कापसाच्या क्षेत्राचा समावेश आहे. विभागात बाजरीच्या ३.९४, मक्याची १२.३९, सोयाबीनची ३.१५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्हानिहाय अनुक्रमे बाजरी, मका, सोयाबीनची झालेल्या पेरण्यांची टक्केवारी अशी : नाशिक-६.४८-१७.०१-१.४४, धुळे-०.२२-१२.८९-१६.१२, नंदूरबार-०-०.४८-०.६१, जळगाव-०-६.४९-०.३९. याशिवाय उसाची ४१.३८ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. त्यात जिल्हानिहाय उसाच्या लागवडी क्षेत्राची टक्केवारी याप्रमाणे : नाशिक-१०.१६, धुळे-९५.३२, नंदूरबार-७५.४०, जळगाव-४७.९५. नाशिक जिल्ह्याचे विभागात सर्वाधिक ३५ हजार ३७६ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी साडेतीन हजारांहून अधिक क्षेत्रावर उसाची लागवड उरकली आहे.

farmer sowing
Nashik : सोशल मीडियावर बदनामी करून खंडणीची मागणी

पीकनिहाय खरीपाच्या पेरण्यांची टक्केवारी

भात : नाशिक-०.०४, धुळे-०.४२, नंदूरबार-०.१३, जळगाव-०

ज्वारी : नाशिक-९.२१, धुळे-२, नंदूरबार-०.०६, जळगाव-०.०२

तूर : नाशिक-२, धुळे-६.८६, नंदूरबार-०.१३, जळगाव-२.४२

मूग : नाशिक-४.३३, धुळे-२.६१, नंदूरबार-०.०८, जळगाव-०.३८

उडीद : नाशिक-०.३३, धुळे-९.६८, नंदूरबार-०, जळगाव-०.५६

farmer sowing
अग्‍निपथ भरती प्रक्रियेसाठी अर्जाची 5 जुलैपर्यंत मुदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.