नाशिक जिल्ह्यातील 60हजार हेक्टरवरील पेरण्या पावसाच्या भरोसे

नाशिक जिल्ह्यातील 60हजार हेक्टरवरील पेरण्या पावसाच्या भरोसे
Updated on
Summary

येवला तालुक्यात पेरण्या ४० टक्के झाल्या असून सरासरी पाऊस १० मिमी आहे. त्यामुळे येथील पेरण्या प्रामुख्याने अडचणीत सापडल्या आहेत.

नाशिक : जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर जिल्हाभरात शेतकऱ्यांनी ६० हजार ३४६ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. एकूण पेरणी (Sowing) क्षेत्रापैकी ही टक्केवारी ९.०७ इतकी असल्याची माहिती कृषी विभागाच्या (ता.२२ जून अखेर) पेरणी अहवालावरून समोर आली आहे. मात्र पेरणी (Sowing) केल्यानंतर पावसान खंड दिल्याने ‘उगवलेली पिके आता पावसाच्या भरोसे’ अशीच परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी दुबार पेरणीची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (sowing has been done in many parts of nashik district after rain)

नाशिक जिल्ह्यातील 60हजार हेक्टरवरील पेरण्या पावसाच्या भरोसे
आरोग्‍य विद्यापीठ कुलगुरूंच्‍या नावावर 5 जुलैला शिक्‍कामोर्तब

जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस झाल्यानंतर पेरण्या झाल्या तर पावसाचा खंड पडल्यानंतर पेरण्या लांबणीवर गेल्या. तर झालेल्या पेरण्या अडचणीत सापडल्या आहेत. जिल्ह्यातील जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १७४.४० मिमी असताना अद्याप १२७.१२ मिमी पाऊस झाला आहे. मात्र इगतपुरी, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर याठिकाणी पाऊस समाधानकारक आहे. इतर तालुक्यात हे प्रमाण ८० मिमीच्या खाली आहे. येवला तालुक्यात पेरण्या ४० टक्के झाल्या असून सरासरी पाऊस १० मिमी आहे. त्यामुळे येथील पेरण्या प्रामुख्याने अडचणीत सापडल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील 60हजार हेक्टरवरील पेरण्या पावसाच्या भरोसे
नाशिक जिल्‍ह्‍यात सलग चौथ्या दिवशी दोनशेहून अधिक पॉझिटिव्‍ह

जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र तृणधान्य पिकाचे आहे. यामध्ये मक्याच्या लागवडी ३० हजार ८१५ हेक्टरवर झालेल्या आहेत. देवळा तालुक्यात मक्याच्या सर्वधिक ४ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. मालेगाव, कळवण, देवळा, सटाणा तालुक्यात बाजरी ६ हजार ६६८ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. इगतपुरी व सटाणा तालुक्यात १०१ हेक्टरवर भात लागवडी झाल्या आहेत. मालेगाव व सटाणा तालुक्यात ३९ हेक्टरवर खरीप ज्वारी पेरण्या झाल्या.

नाशिक जिल्ह्यातील 60हजार हेक्टरवरील पेरण्या पावसाच्या भरोसे
नाशिक जिल्‍ह्यात आज 128 रुग्‍णांची कोरोनावर मात

गळीत धान्यात सोयाबीनच्या ३ हजार ५३४ हेक्टरवर तर भुईमूगच्या ३ हजार ३३० हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. येवला तालुक्यात २ हजार १६८ हेक्टरवर सोयाबीन तर १ हजार २२० हेक्टरवर भुईमूग पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. इतर तालुक्यात किरकोळ प्रमाणात आहेत. कडधान्यात सर्वधिक पेरण्या मुगाच्या ५ हजार ९४४ हेक्टरवर झाल्या आहेत. त्यापैकी येवला तालुक्यात ४ हजार ४७३ हेक्टरवर तर चांदवड, देवळा, नांदगाव, मालेगाव व सटाणा तालुक्यात हे प्रमाण कमी आहे. यासह तूर, उडीद पेरण्यांचा टक्का किरकोळ आहे.

नाशिक जिल्ह्यातील 60हजार हेक्टरवरील पेरण्या पावसाच्या भरोसे
नाशिक शहरातील 22 रुग्णालयांना मान्यता रद्द करण्याची नोटीस

कापूस लागवडी जिल्ह्यात सर्वाधिक १० हजार हेक्टरवर झाल्या आहेत. त्यापैकी एकट्या मालेगाव तालुक्यात ६ हजार ९०३ हेक्टर आहेत. तर येवला तालुक्यात व नांदगाव तालुक्यात पाऊस व संरक्षित सिंचनावर ४६३ हेक्टरवर झाल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील 60हजार हेक्टरवरील पेरण्या पावसाच्या भरोसे
14 महिन्यांत नाशिक अमरधाममध्ये जळाली 5 हजार टन लाकडे

पिकप्रकार... सर्वसाधारण पेरणी क्षेत्र... झालेल्या पेरण्या... टक्केवारी

तृणधान्य... ४,४५,७९७... ३७,६५९... ८.४५

गळीतधान्य... ९४,७७२... ५,८६४... ६.१९

कडधान्य... ८४,६९०.८४... ६,६८२... ७.८९

कापूस... ४०,३२२... १०,१४१... २५.१५

एकूण पेरणी क्षेत्र...६,६५,५८२.२०... ६०३४६.४०... ९.०७

नाशिक जिल्ह्यातील 60हजार हेक्टरवरील पेरण्या पावसाच्या भरोसे
चांगली बातमी! नाशिक शहर बससेवेच्या ट्रायल रनला सुरवात

काही ठिकाणी पेरण्यांनंतर पावसाचा खंड पडला आहे.ज्या ठिकाणी जड जमिनी असल्यास अडचण कमी आहे.मात्र ज्या जमिनी हलक्या आहेत. अशा ठिकाणी संरक्षित सिंचन व्यवस्था असल्यास पिकाला पाण्याची एक पाळी देणे अपेक्षित आहे.इतर शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.पाऊस झाल्यास आगामी महिन्याच्या सुरुवातीला पेरणी करू शकतो.

-विवेक सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()