नाशिक : देशातील पहिली टायरबेस मेट्रो निओ प्रकल्प नाशिकमध्ये सुरू होणार असल्याचे बोलले जात असले तरी अद्यापही तो प्रकल्प दृष्टिपथात येत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल असल्याचे दोन वर्षांपासून बोलले जात आहे. (space in Satpur Ambad MIDC for metro neo project office nashik news)
परंतु त्यासंदर्भात निर्णय होत नाही. असे असताना मेट्रो कार्यालयासाठी सातपूर किंवा अंबड एमआयडीसीमध्ये जागेचा शोध सुरू असल्याचे समजते.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांना मेट्रो निओची भेट दिली होती. २०२० च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील पहिल्या टायरबेस मेट्रो प्रकल्पाची घोषणा केली. या वेळी २०२३ मध्ये प्रकल्प प्रत्यक्षात अमलात होईल, अशी घोषणा केली होती.
परंतु अद्याप मेट्रो प्रकल्पाच्या कामाला सुरवात झालेली नाही. पंतप्रधान कार्यालयात फाइल अडकून पडल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रकल्प आवडल्याने वाराणसीमध्ये प्रकल्प साकारायचा आहे.
हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा
त्यामुळे दोन्ही प्रकल्पांचे एकाच वेळी उद्घाटन होईल असे सांगितले गेले, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या गोरखपूर विधानसभा मतदारसंघातदेखील टायरबेस मेट्रोचा प्रकल्प साकारायचा असल्याने नाशिकचा प्रकल्प रखडल्याचे बोलले जात आहे.
प्रकल्प रखडल्याने लोकप्रतिनिधींना सोशल मीडियावरून सवाल विचारला जात आहे. असे असताना मेट्रो निओ प्रकल्पाबाबत नवीन घडामोड समोर येत असून, मेट्रो निओ प्रकल्प साकारण्यासाठी कार्यालयासाठी जागेचा शोध सुरू आहे. सातपूर किंवा अंबड औद्योगिक कार्यालयात जागेचा शोध सुरू आहे. महापालिकेकडे मुख्यालयात जागेची मागणी करण्यात आली होती, परंतु महापालिकेने जागा देण्यास नकार दिल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.