Metro Neo : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होऊ घातलेल्या पायाभूत प्रकल्पांचा नारळ फोडण्याची तयारी सत्ताधारी भाजपकडून करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या अडीच वर्षांपासून रेंगाळत पडलेला मेट्रो निओ प्रकल्पासाठी जागेचा शोध सुरू झाला आहे.
गंगापूर रोड भागात महामेट्रोला जागा मिळत नसल्याने अखेर महापालिकेने तीन एकर मोकळा भूखंड देण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचबरोबर सिन्नर फाटा येथील सिटीलिंक कंपनीची जागादेखील महामेट्रोला देऊन तेथील डेपो चेहेडी येथे हलविला जाणार आहे. (Space not available for Metro Neo in Gangapur area NMC readiness to provide vacant plot of 3 acres nashik news)
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ च्या निवडणूक प्रचारात नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली. दत्तक पिता अभियानांतर्गत ५ ऑक्टोबर २०१८ रोजी नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली.
मेट्रो निओ प्रकल्पास २९ ऑगस्ट २०१९ ला राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. २०२० च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी २०९२ कोटींची तरतूद करण्यात आली. २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण होईल, असे त्या वेळी आश्वासित करण्यात आले होते.
परंतु अद्याप प्रकल्पाचा नारळदेखील फुटला नाही. मेट्रो निओ प्रकल्पाचे नाशिककरांना गाजर मिळाले काय, असा सवाल उपस्थित होत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मेळाव्यात दोन ते तीन महिन्यात मेट्रोचा प्रकल्प मार्गी लागेल अशी घोषणा केली.
त्यानंतर प्रकल्पासंदर्भात काही प्रमाणात हालचाली झाल्या. दिल्ली येथे मेट्रो संदर्भात बैठकदेखील झाली. त्यानंतर नाशिक महापालिका मुख्यालयात मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी भेट देत जागेसंदर्भात मागणी केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कानेटकर उद्यानाच्या बाजूचा भूखंड
मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात प्रकल्पाला मंजुरी मिळाली असली तरी अद्यापही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाकडून खर्च करण्याची तयारी दर्शवली.
नाशिक रोड ते मुंबई नाका व पुढे गंगापूर अशा दोन टप्प्यासाठी शासनाने अकराशे कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याअनुषंगाने महामेट्रोने केलेल्या पाहणीत दोन जागांची मागणी केली.
सिन्नर फाटा येथे मल्टी मॉडेल हब तयार केले जाणार आहे. त्यासाठी सिटीलिंकच्या जागेची मागणी करण्यात आली आहे. सिटीलिंकचा डेपो भविष्यात चेहेडी येथील ट्रक टर्मिनस जागेवर हलविला जाणार आहे.
गंगापूर येथे मेट्रोचा टर्मिनल राहणार आहे. तेथे तीन एकर जागेची मागणी नोंदविण्यात आले. परंतु, मेट्रोसाठी जागा नसल्याने महापालिका कानेटकर उद्यानाच्या बाजूला असलेला तीन एकराचा मोकळा भूखंड देण्याची तयारी महापालिकेने केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.