Nashik News : जातवैधता प्रमाणपत्रासाठी 'या' तारखेपर्यंत विशेष मोहीम

Caste  Certificate
Caste Certificateesakal
Updated on

Nashik News : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत सामाजिक न्याय पर्व कालावधीत इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती उपायुक्त तथा नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य राकेश पाटील यांनी दिली. (Special campaign till 30th April for caste validity certificate nashik news)

जिल्ह्यातील अकरावी व बारावी विज्ञान शाखेत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी शिक्षणशुल्काची प्रतिपूर्ती करण्याकरिता जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Caste  Certificate
Nashik News : पोषण आहार अनुदानाच्या वाटपात घोळ; प्राथमिक शिक्षक संघाचे नांदगावला बेमुदत उपोषण

तंत्रनिकेतन अभ्यासक्रमात प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या प्रवर्गातील ज्यांनी पडताळणीचे ऑनलाइन अर्ज भरलेले नाहीत, त्यांनी सर्व मूळ कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावेत.

अपलोड केलेला अर्ज व मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रती व मूळ शपथपत्र जिल्हा जात पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्र, नाशिक येथे कार्यालयीन वेळेत जमा करावेत. अर्जदारांनी आपला युझर आयडी व पासवर्ड जतन करून ठेवावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

Caste  Certificate
NMC News : दीड महिन्यात 2352 अनधिकृत फलक हटविले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.