नाशिक : शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी व्हिजिबिलिटी पोलिसिंगवर आपण भर देणार आहोत. त्याचप्रमाणे वाढत्या सायबर गुन्हेगारीला रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. (Special efforts to prevent cyber crime Police Commissioner ankush Shinde accepted charge Nashik News)
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
नवनियुक्त पोलिस आयुक्त शिंदे यांनी शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी पोलिस आयुक्तालयात हजर होत. मावळते आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारली. याप्रसंगी त्यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांशी औपचारिक चर्चा केली. आयुक्त शिंदे म्हणाले, शहरात दृश्य स्वरूपात पॉलिसी दिसणे आवश्यक आहे. त्यामुळे गुन्हेगारांना अटकाव होतो.
यावर आपण भर देणार आहोत. त्याचप्रमाणे शहराची मुख्य समस्या वाहतुकीचे असून, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी संबंधित विभागांच्या प्रमुखांसह सविस्तर आढावा घेऊन ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्हेगारी मोठी समस्या निर्माण झाली आहे. सायबर पोलिसांच्या माध्यमातून या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आपला विशेष प्रयत्न राहतो.
त्या दृष्टिकोनातून शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपली प्राथमिकता राहणार असल्याचे नवनियुक्त आयुक्त शिंदे यांनी सांगितले. या वेळी पुणे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, प्रशासन विभागाच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्यासह सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
"शहरातील गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी दृश्य पोलिसिंगवर आपला भर असेल. सर्व विभागांच्या आढावा बैठकीनंतर योग्य नियोजनही केले जाईल.
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, नाशिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.