इराणमध्ये अडकले भारतीय नागरिक...भारतातून विशेष वैद्यकीय पथक दाखल

corona 1.jpg
corona 1.jpg
Updated on

नाशिक : कोरोना विषाणूने जगभर थैमान घातलेले असताना, चीन, युरोपीय देशांत उच्चतम वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. परंतु इराणमध्ये वैद्यकीय सुविधा नाहीत. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांचा वैद्यकीय उपचाराअभावी मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. त्यातच इराणमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक अडकले असल्याने, त्यांना वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी भारतातून तज्ज्ञ संशोधकांसह विशेष वैद्यकीय पथक दाखल झाले आहे. दरम्यान, देशभरात मास्कचा तुटवडा जाणवत असून, काही व्यावसायिकांकडून मास्कची साठवणूक व अव्वाच्या सव्वा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्रात आरोग्य विभाग आणि अन्न व औषध पुरवठा विभागाच्या विशेष भरारी पथकांकडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात मास्कची साठवणूक रोखण्यासाठी भरारी पथक 

चीन पाठोपाठ युरोपीय आणि आखाती देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. आखाती देशांच्या तुलनेने युरोपीय देशांमध्ये वैद्यकीय सुविधा सर्वोत्तम आहेत. तुलनेत आखाती देशांतील इराणमध्ये वैद्यकीय सेवा-सुविधांचा अभाव असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. त्यातच इराणमध्ये भारतीयांची संख्याही मोठी आहे. त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी गेल्या आठवडाभरापासून केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन इराणमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत. त्यानुसार, तज्ज्ञ वैद्यकीय संशोधकांसह विशेष वैद्यकीय पथक आणि औषधसाठा इराणकडे रवाना करण्यात आला आहे. या पथकामुळे इराणमध्ये अडकून असलेल्या भारतीयांची कोरोनासदृश लागणची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. तसेच त्यांच्यावर औषधोपचारही केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य समितीच्या सदस्या खासदार डॉ. भारती पवार यांनी दिली. 

मास्कच्या साठेबाजांवर कारवाई 
कोरोना विषाणूपासून बचावासाठी मास्क वापराच्या अफवांमुळे मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. दिल्लीमध्ये एन-95 प्रकारातील मास्कची किंमत पाच हजार रुपयांवर पोचली आहे. तीच परिस्थिती नाशिकसह राज्यातही उद्‌भवली आहे. साधा मास्कही खुल्या बाजारात उपलब्ध नसल्याने, व्यावसायिकांकडून मास्कची साठवणूक करून जादा दराने विक्री होते आहे. अशा व्यावसायिकांविरोधात कारवाई करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त भरारी पथकाने कारवाई सुरू केली आहे. 
 

विशेष पथक रवाना
इराणमध्ये अडकून असलेल्या भारतीयांसाठी केंद्रीय आरोग्य विभागामार्फत सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. तेथील आरोग्य सुविधांचा अभाव लक्षात घेऊन विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. त्यांची मदत भारतीय नागरिकांना होणार आहे. -खासदार डॉ. भारती पवार, सदस्य, केंद्रीय आरोग्य समिती 
-- 
मास्कच्या साठवणुकीविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. त्यासाठी आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकांची नियुक्ती करून पथकाकडून साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. 
-डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.