Nashik : सेनेच्या बालेकिल्लावर ‘विशेष’ वॉच

Shiv Sena
Shiv Sena esakal
Updated on

नाशिक : शिवसेनेतील (Shiv sena) बंडाळीची धग आता महापालिकांपर्यंत (NMC) पोहचत असून, ठाणेपाठोपाठ शिवसेनेचा बालेकिल्ला असलेले नाशिक काबीज करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे समजते. त्यासाठी शासनाच्या विशेष यंत्रणेचा वापर केला जात असून, नाशिक महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांसह शहर-जिल्ह्यातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांवर या विशेष यंत्रणेकडून ‘वॉच’ ठेवला जात आहे. यात यश आले तर हाच कित्ता राज्यभर राबविला जाण्याचीही शक्यता आहे. (Special watch on Shiv sena Balekilla Maharashtra Political news)

इडी-सीबीआयच्या धाकदडपशाहीमुळे शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केल्याचे बोलले जात असले तरी, याच बंडखोर आमदारांनी भाजपच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे सरकार उलथून लावत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले आहे. आम्हीच खरी शिवसेना, असे म्हणून बंडखोर आमदारांनी (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेसमोर अस्तित्वाचे आव्हान उभे केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घालत बंडखोरांविरोधात लढा देण्याचे आवाहन केले आहे.

असे असतानाही, ठाणे महापालिकेतील बहुतांशी नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शवीत शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणून बंडखोरांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिकांमध्येही काहीशी अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. तर, आमदारांच्या बंडखोरीनंतर दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारकडूनही राज्यातील शिवसेनेच्या खासदारांसह नगरसेवक, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांना शिंदे गटात सामील करण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे. त्यासाठी सरकारची विशेष यंत्रणेचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे. त्याच अनुषंगाने शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकच्या शिवसेनेवर ‘वॉच’ ठेवला जात असून, येत्या काही दिवसात मोठी समीकरणे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Shiv Sena
पथविक्रेत्यांना कर्ज वाटपात नाशिक महापालिका अव्वल

नगरसेवक-प्रमुख पदाधिकाऱ्यांवर नजर

नाशिक महापालिकेत भाजपनंतर शिवसेना हा मोठा पक्ष आहे. शिंदे गटाचा नाशिकमध्ये फारसा प्रभाव नाही, यामुळे खासदार संजय राऊत यांनी शक्ती प्रदर्शनासाठी नाशिक निवडल्याचे बोलले जाते. दरम्यान, दुसरी बाजू पाहता शिवसेनेतील बंडाळीचा मुंबई, कोकणनंतर नाशिकवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने, शिंदे गटाकडून शिवसेनेचा नाशिकचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी ‘इडी-सीबीआय’ साधर्म्य शासकीय यंत्रणेची मदत घेतली जात असून, शिवसेनेचे नगरसेवक, प्रमुख पदाधिकाऱ्यांना वळविण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून शिंदे गटात सामील होऊ शकणाऱ्यांची माहिती घेतली जात आहे.

Shiv Sena
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ : गंगाथरन डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.