Nashik News: खेडलेझुंगे येथील गोदावरी नदीपात्रात विषारी रसायनिक पदार्थाचा तवंग; जलिय परिसंस्था धोक्यात!

Spillage of toxic chemicals in Godavari river
Spillage of toxic chemicals in Godavari riveresakal
Updated on

खेडलेझुंगे (जि. नाशिक) : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे गोदावरी नदीवर असलेल्या बंधाऱ्यावरील जलाशयात हजारो मासे मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आलेले आहेत. तसेच नदीतील १००० ते १५०० मीटर पर्यंतच्या जलप्रवाहातील पाणी पूर्णतः दुधाळ झालेले आहे. (Spillage of toxic chemicals in Godavari river basin at Khedlejunge Aquatic ecosystem in danger Nashik News)

औद्योगीक वसाहतीतून विषारी रासायनिक पदार्थ टँकरद्वारे नदीमध्ये टाकल्याने पाणी विषारी झाल्याने मासे मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नदीतील रसायनयुक्त दूषित पाण्यामुळे परिसरात उग्र आणि घान दर्प पसरला आहेत याचा सर्व नागरिकांना त्रास होत आहेत.

स्थानिकांनी ग्रामपंचायत सरपंच यांचेकडे गस्त समिती नेमून रात्री अपरात्री घडणाऱ्या प्रकारांना आळा घालण्याची मागणी केली आहे. प्रदूषित पाणी जमिनीत मुरल्याने भुगर्भातील जलसाठा ही प्रदूषित होत आहे.

त्यामुळे लवकरात लवकर दूषित दुर्गंधीयुक्त विषारी पाण्याची तीव्रता कमी करून वापरणे योग्य बनविणेसाठी पाटबंधारे विभागाकडून पाण्यातील विषारी रासायनिक पदार्थाची चाचणी करून लवकरात लवकर पुढील प्रक्रिया राबवावी.

बंधाऱ्यात रसायन मिश्रित दूषित पाणी आले कुठून याचा शोध घेवून संबंधितावर कारवाई करणे गरजेचे आहेत अशी मागणी लासलगाव पोलिसांकडे नागरिकांनी केली आहेत. उन्हाळा सुरू झाला आहे आणि पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे.

त्याचवेळी हे दुष्कृत्य अज्ञात व्यक्तीने केल्याने लासलगाव पोलिसांकडे त्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आणि नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात यावी ही मागणी वर्गाकडून होत आहे.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

Spillage of toxic chemicals in Godavari river
Monkey Funeral : टेहरे ग्रामस्थांकडून माकडावर अंत्यसंस्कार

उन्हाळा सुरू झाला आहे आणि पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे त्याचवेळी हे दुष्कृत्य अज्ञात व्यक्तीने केल्याने लासलगाव पोलिसांकडे त्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे नागरिकांनी आवाहन केले आहेत तसेच नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात यावी ही मागणी नागरिकांकडून होत आहे.

जलचर सजीवांचे अस्तित्व धोक्यात

पाणी प्रदूषित झाल्याने पाण्याची ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन सर्व जलचर मृत्युमुखी पडत आहे. बंधाऱ्याच्या पूर्व दिशेस पाण्यावर मृत माशांचा खच होत आहे.जलचर सजीवांच्या मृत्युमुखी पडल्याने पाणी प्रदूषित होत आहे.सर्व पाणी रसायनयुक्त दुधाळ रंगाचे झाले असून पिण्यास आणि वापरण्यास धोकेदायक आहेत यामुळे जलिय परिसंस्था आरोग्यास धोक्यात आली आहे.

मानवी वापरासाठी आणि शेतीसाठी धोकादायक.

नदीतील पाणी हे शेतीसाठी,घरगुती वापरासाठी आणि पशुधनाला पिण्यासाठी वापरले जाते यामुळे पिकांना अपाय होऊ शकतो,पशुधनाला पचनसंस्थेचे विविध विकार होण्याची शक्यता आहे,तसेच दुधातून हे विषारी द्रव्ये मानवी अन्नसाखळी मध्ये प्रवेशित होऊन दूध सेवन करणाऱ्या घटकांना ही त्यामुळे विषबाधा होऊ शकते,तसेच जीवघेणे आजार होऊ शकतात.

"मृत माशांच्या आणि पाण्याच्या नमुन्यांच्या चाचणी करून त्यातील विषारी केमिकल युक्त पदार्थ शोधून तो निफाड, सिन्नर तालुक्यातील कोणत्या कंपनीत हे वेस्ट प्रॉडक्ट आढळते यावरून संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात यावी ही मागणी करत आहे."

- प्रसाद घोटेकर, (सामाजिक कार्यकर्ते)

Spillage of toxic chemicals in Godavari river
Nashik News : बाणगावला रस्ताचे काम निकृष्ट दर्जाचे! काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याला पडल्या भेगा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()