नाशिक रोड : आध्यात्मिक सौंदर्यशास्त्राने नटलेला फॅशन शो नाशिकमध्ये झालाय. देशाच्या विविध भागातून आलेल्या सौंदर्यवतींनी त्याद्वारे उपस्थितांची मने जिंकली आहेत. नाशिकची कलावंत आणि आयबीटी शिक्षण संस्थेच्या प्रमुख भाग्यश्री देशपांडे-धर्माधिकारी यांनी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील ग्रेप काउंटीमध्ये देवी-देवतांच्या शृंगार रस असणारा हा आध्यात्मिक फॅशन शो आयोजित केला होता. (Spiritual Wear Fashion Show at Grape county hotel in Nashik News)
नाशिकमधील आध्यात्मिक फॅशन शोमध्ये दुबई, मलेशिया, अमेरिका, नेदरलँड, रशिया, गुजरात येथून सौंदर्यवतींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता, खासदार हेमंत गोडसे, कर्नल अशोक मुजुमदार, बांधकाम व्यावसायिक दिनेश चंदे, किरीट चौहान, महंत अनिकेतशास्त्री देशपांडे, माजी नगरसेवक रमेश धोंगडे, रोहन देशपांडे आदी उपस्थित होते. नाशिकमध्ये पहिल्यांदाच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक फॅशन शो झाल्याने शिक्षण, अध्यात्म, संस्कृती कला अशा क्षेत्रांतील अनेकांनी हजेरी लावली.
रामायणात उल्लेख केला आहे, की
शृंगारमेव रसनाद रसमामनामः। शृंगाररस हा प्रमुख रस आहे ।
तमभिनयेत स्मितवदन मधुरकथन भूपेक्ष कटाक्षादिभिरनभावै:।
शृंगार रसाला शास्त्राकारांनी ‘रसराज' ही संज्ञा दिली. या संसारात जे उज्ज्वल आणि दर्शनीय आहे ते सर्व शृंगार रसात समाविष्ट आहे. पशू, पक्षी, प्राणी, वृक्ष, मानव व देवता हे सर्व अनादिकालापासून शृंगार रसाने प्रभावित आहेत.
अयोध्या कांडातील श्लोक
अप्सु निमर्थनात् एव रसात् तस्मात् वर स्त्रिय:।
उत्पेतु: मनुज श्रेष्ठ तस्मात् अप्सरसो अभवन् ॥
घृताचीम् अथ विश्वाचीम् मिश्र केशीम् अलम्बुसाम् ।
नागदन्तां च हेमा च हिमामद्रिकृतस्थलाम् ॥
अयोध्याकांडातील हा श्लोक. भारद्वाज मुनींनी केलेल्या भरताच्या आदर सत्कारात घृताची, विश्वाची, मिश्रकेशी, अलम्बुसा, नागदंता, हेमा व हिमा या अप्सरांना पाचारण केल्याचा उल्लेख येतो. या सर्व नृत्य, गायन व वादन कलांत निपुण होत्या आणि त्यांनी भरत व अयोध्येच्या सेनेला मोहित करण्यासाठी नृत्य-गायन केल्याचा उल्लेख नंतरच्या श्लोकातून येतो. पुराणकथा, वेद, महाकाव्ये व नाट्यशास्त्राच्या आधारे काही अप्सरांची नावे दिली आहेत.
ती अशी : अद्रिका, अल्मविशा, अंबिका, अन्वद्या, अनुचना, अरुणा, असिता, बुदबुदा, देवी, घृताची, गुणमुख्या, गुणवरा, काम्या, कर्णिका, केशिनी, क्षेमा, चित्रलेखा, लता, लक्ष्मणा, मनोरमा, मरिची, मेनका, मिश्रकेशी, मिश्रस्थला, पूर्वचित्ती, रक्षिता, रंभा, रितुशाला, सहजन्या, समिची, सौदामिनी, सौरभेदी, शरद्वती, शुचिका, सोमा, सुवाहू, सुगंधा, सुप्रिया, सुरजा, सुरसा, सुरता, सुलोचना, तिलोत्तमा, उमलोचा, उर्वशी, वपू, वर्गा, विद्युत्पर्णा आणि विश्वची.
"आम्ही भारताची संस्कृती अध्यात्म-साहित्य अशी सांस्कृतिक परंपरा दाखविण्याचा प्रयत्न केला. त्याला नाशिककरांसह विविध देशातील सौंदर्यवतींनी साथ दिली. फॅशन शोकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा आमचा छोटा प्रयत्न होता." - भाग्यश्री देशपांडे-धर्माधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.