Asthma Disease : भारतासह जगभरात श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या दम्याच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. वेळीच दम्याचे निदान होत नसल्याने हे प्रमाण वाढत असल्याने, पहिल्या टप्प्यातच निदान करणारे तंत्र ‘स्पायरोमीटर’ विकसित करण्यात आले आहे.
या तंत्रामुळे दम्याचे पहिल्याच टप्प्यात निदान होऊन औषधोपचाराने दम्यावर मात करणे शक्य होणार आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यामुळे या स्पायरोमीटर प्रणालीने जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सुमारे १२ हजार नागरिकांची तपासणी केली असता, त्यात १६ टक्के नागरिक संभाव्य श्वसनाचे विकाराने ग्रस्त आढळून आलेले आहेत.
येत्या काळात या प्रणालीनुसार नागरिकांची मोफत तपासणी करून बाधितांवर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. (Spirometer will diagnose asthma early Free examination and treatment will conducted in 5 talukas of district nashik news)
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने श्वसनासंबंधीच्या आजारांविषयी रोग चिकित्सा निदान, उपचार व जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे.
त्याअंतर्गत पुण्यातील ब्रायोटा टेक्नोतर्फे डेन्मार्कच्या वैज्ञानिकांच्या मदतीने श्वसन विकारावर नावीन्यपूर्ण स्पायरोमीटर या प्रणालीची निर्मिती केली आहे. या स्पायरोमीटरमुळे दम्याचे पहिल्या टप्प्यातच निदान करणे शक्य झाले आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या पुढाकारातून निफाड, दिंडोरी, कळवण, येवला व सुरगाणा या तालुक्यातील मोजके १२ हजार ४५४ नागरिकांची तपासणी स्पायरोमीटरने करण्यात आली.
त्यावेळी १६ टक्के नागरिक श्वसनाचे आजाराचे संभाव्य रुग्ण आढळून आले आहेत. येत्या सहा महिन्यांमध्ये निफाड, दिंडोरी, कळवण, येवला व सुरगाणा या तालुक्यातील रहिवाशांची ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात येणार आहे.
सदरील तपासणी निःशुल्क असून, दम्याच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची सहा महिन्यापर्यंतचे औषधोपचार मोफत केले जाणार आहे. यासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. योगेश चित्ते, ब्रायटा टेक्नॉलॉजीचे डॉ. किरण साखरे व त्यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेत आहेत.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
ही आहेत कारणे
घरातील धुळ, चुलीवरचा धूर, गावातील रस्त्यावरचे प्रदूषण, औद्योगिक कारखान्यांमधून निघणारा धुळ, सिगारेट पिणे या कारणांनी श्वसनाचे विकास जडण्याची शक्यता अधिक बळावते. ज्यांना कोरोना व क्षयरोग झालेला होता, अशा रुग्णांना अस्थमा व दम्याचा आजार होण्याचे प्रमाण हे ८७ टक्के असल्याचे समोर आलेले आहे.
या विकाराने जगातील प्रत्येक २० व्यक्तीमागे एकाला ग्रासले असून, जगभरात सध्या ३०० दशलक्षपेक्षा अधिक रुग्ण ग्रस्त आहेत.
"जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, येवला, निफाड, सुरगाणा या तालुक्यांमध्ये येत्या सहा महिन्यांपर्यंत शिबिर राबविले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या लाभ घ्यावा. यावेळी वेळीच निदान होऊन औषधोपचार करून रुग्ण बरा होऊ शकतो."
- डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.