Shri Swami Samarth Kendra : श्री. स्वामी समर्थ केंद्र ही समाज आणि राष्ट्र घडविणारी केंद्रे झाली असून आज समाजातील सर्व घटक समर्थ सेवामार्गाकडे आकर्षित होत आहे असे उद्गार नितीनभाऊ मोरे यांनी काढले. (Spontaneous response of women in self defense camp at shri swami Samarth Kendra nashik news)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्र आणि समर्थ गुरुपीठाच्या वतीने विद्यार्थी विशेषतः मुली आणि महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम व्यापक प्रमाणात हाती घेण्यात आला असून रविवारी नाशिक महात्मा नगरातील उदयनगर केंद्रात या उपक्रमाचा शुभारंभ नितीनभाऊ मोरे, आमदार देवयानी फरांदे, माजी नगरसेविका स्वातीताई भामरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या प्रसंगी मोरे बोलत होते. समर्थ गुरुपीठसह देशभरातील सर्व केंद्राच्या माध्यमातून हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवून खऱ्या अर्थाने महिला सक्षमिकरण करण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
उपक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने झाल्यानंतर उपस्थित विद्यार्थी, पालक, सेवेकरी यांचेशी संवाद साधताना नितीनभाऊ मोरे म्हणाले, ‘आज आपल्या घरातील, समाजातील महिला, मुली किती असुरक्षित आहेत ते आपण रोज अनुभवतो आहोत. यासंबंधित मनाला यातना देणाऱ्या बातम्या आपण प्रसार माध्यमातून रोज पाहतो, वाचतो, ऐकतो.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या बातम्यांनी मन प्रचंड अस्वस्थ होते परंतु आता या गोष्टीचा फक्त निषेध व्यक्त करून, दुःख व्यक्त करून चालणार नाही तर आपल्याला यासाठी आता आपल्या घरातील माता भगिनींना शरीराने, मनाने सशक्त करावे लागेल आणि यासाठीच गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने हा समाजपयोगी कार्यक्रम आपण हाती घेतला आहे. या प्रशिक्षणात अशा काही छोट्या युक्त्या आपणास शिकवण्यात येतात की त्या वापरून आपण समोरच्या ताकदवान पुरुषाला सुद्धा नमवू शकतो.’
समर्थ सेवा मार्गाच्या कार्याची माहिती देताना नितीनभाऊ म्हणाले गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनात देशभर काम करणारा सेवामार्ग हा जरी आध्यात्मिक मार्गदर्शन करणारा असला तरी या माध्यमातून आज जगभर समाजपयोगी आणि राष्ट्रोपयोगी कार्य मोठया प्रमाणात सुरू असून समर्थ केंद्र आज समाज व राष्ट्र घडविणारी केंद्रे झाली आहेत.
आज बालसंस्कार, युवासंस्कार, पर्यावरण रक्षण, सेंद्रिय शेती, आरोग्य, स्वच्छता मोहिमा, आयुर्वेद असे अनेक उपक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेऊन एकप्रकारे राष्ट्र सशक्त करण्याचे अभियानच सेवा मार्गाने हाती घेतले आहे.
मान्यवरांची मनोगते झाल्यानंतर केंद्राच्या आवारात प्रशिक्षण देण्यात आले यात महिला व मुलींनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. यशस्वितेसाठी सेवामार्गाचे जिल्हा प्रतिनिधी घोडेराव, केंद्र प्रमुख सूर्यवंशी, निंबा शिरसाठ, विजय पाटील यांनी परिश्रम घेतले. उपस्थित प्रशिक्षणार्थींना दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.