SAKAL Exclusive : क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता Online होणार!

Sports Certificate
Sports Certificateesakal
Updated on

नामपूर (जि. नाशिक) : विविध पदकप्राप्त प्रतिभावंत खेळाडूंना शासनाच्या सेवा सवलतींचा लाभ घेण्यासाठी क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी बंधनकारक आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंच्या क्रीडा प्रमाणपत्रांची वैधता पडताळणी आता ऑनलाइन होणार आहे. यासाठी क्रीडा विभागाने ऑनलाइन प्रणाली विकसित केली असून, यामुळे खेळाडूंचा वेळ, पैसा, श्रम वाचणार असल्याने खेळाडूंनी राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. (Sports Certificate Verification Now Online Nashik SAKAL Exclusive news)

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त राज्यातील खेळाडूंना क्रीडा विभागामार्फत शासकीय व निमशासकीय सेवेत पाच टक्के आरक्षण देण्यात आले आहे, यासाठी खेळांडूच्या क्रीडाविषयक प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे काम क्रीडा विभागामार्फत करण्यात येते. या पडताळणीसाठी खेळाडूंचा अर्ज, त्यांचे क्रीडाविषयक प्रमाणपत्र, संघटनांमार्फत त्या-त्या क्रीडा स्पर्धांची विविध आवश्यक कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करण्यात येत होती.

तथापि, बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकरी मिळविणे, तसेच, संघटना सचिव यांची बनावट स्वाक्षरी व कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याद्वारे पात्र खेळाडूंच्या बाबतीत अन्याय झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे क्रीडा विभागामार्फत ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याबाबतचा निर्णय युवक व क्रीडा मंत्रालयाने घेतला आहे.

हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

Sports Certificate
BJP Mission 2024 : डॉ. भारती पवार यांची नाशिक लोकसभेत Entry

खेळाडू आरक्षणासाठी महाऑनलाइनमार्फत प्रणाली विकसित करण्यात आली होती. ऑनलाइन प्रणालीद्वारे खेळाडूंचा अर्ज क्रीडा विभागाकडे येत होता, त्यावर क्रीडा विभागामार्फत कार्यवाही करण्यात येऊन संबंधित खेळाडूंना त्यांच्या कामगिरीचा पडताळणी अहवाल देण्यात येत होता. याद्वारे खेळाडूंना त्यांच्या अर्जाची माहिती किंवा प्रलंबित असल्याबाबतचा तपशील उपलब्ध होहेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

त नव्हता. त्यामुळे क्रीडा विभागाने संपूर्ण ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे.

क्रीडा प्रमाणपत्रांच्या पडताळणीची कार्यवाही ऑनलाइन असल्याने, खेळाडूंना त्यांच्या अर्जाची सद्य:स्थिती कळू शकेल. ऑनलाइन प्रणालीद्वारे सर्व कामकाज केले जाणार असल्याने सर्व डाटा ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. ऑनलाइन पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता व गती येणार आहे.

अशी होणार पडताळणी

ऑनलाइन प्रणालीद्वारे खेळाडू त्यांची प्रमाणपत्र पडताळणी नोंदणी करून अर्ज व इतर कागदपत्रे ऑनलाइन सादर करतील. खेळाडूंचा ऑनलाइन अर्ज क्रीडा विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागाचे विभागीय क्रीडा उपसंचालक त्यावर ऑनलाइन कार्यवाही करून, खेळाडूंना पात्रताविषयक अहवाल प्रदान करतील.

Sports Certificate
Nashik Rabi Season : जिल्ह्यात रब्बीच्या अवघ्या 17 टक्के पेरण्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.