नाशिक : आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवून देशाचा नावलौकिक वाढवणाऱ्या खेळाडूंना शासकीय नोकरीत सामावून घेतले जात नसल्याचा मुद्दा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता. ३) विधीमंडळाच्या सभागृहात उपस्थित केला.
या प्रश्नाला उत्तर देत क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकचे खेळाडू कविता राऊत, दत्तू भोकनळ, अंजना ठमके यांना दोन महिन्यात ‘क्लास वन’ नोकरीत सामावून घेतले जाईल, असे आश्वासन दिले आहे. (Sports Minister girish Mahajan assurance Kavita Raut Dattu Bhokanal Anjana Thamke will be Class One officer nashik news)
आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत, दत्तू भोकनळ व अंजना ठमके या खेळाडूंचा महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान केला आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार सुद्धा २०२० मध्ये दत्तू भोकनळ यांना प्राप्त झाला.
३० एप्रिल २००५ च्या शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. १ मे २०११ च्या शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंसाठी शासकीय सेवेत थेट नियुक्तीची मानके देखील निश्चित केलेली आहेत.
या खेळाडूंनी हे निकष पूर्ण केलेले असताना त्यांना अद्याप शासकीय नोकरी का मिळाली नाही, असा मुद्दा माजी मंत्री भुजबळांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना क्रीडामंत्री महाजन म्हणाले, नवीन क्रीडा धोरणानुसार या खेळाडूंना ‘क्लास वन’ अधिकारी म्हणून शासकीय सेवेत सामावून घेतले जाईल, असे आश्वासन दिले.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
"आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना शासकीय नोकरीत सामावून घेण्याविषयी २०१८ मध्ये तीन शासन निर्णय आहेत. त्यानुसार कविताला ‘क्लास वन’ अधिकारी म्हणून नोकरी मिळणे अपेक्षित होते. तिच्या बरोबरच्या खेळाडूंना नोकरी मिळाली. पण नाशिकच्या खेळाडूंवर अन्याय का होतो, हे आजवर न उलगडलेले कोडे आहे. ‘ओएनजीसी’ या कंपनीत देहरादून येथे सध्या ती कार्यरत असली तरी वर्ग १ ची अधिकारी होण्याचा तिचा हक्क तिला अद्याप मिळालेला नाही. अखेरची उमेद म्हणून राज्यपालांना भेटूनही तिला न्याय मिळालेला नाही. आता त्या विषयावर प्रतिक्रिया द्यायलाही आम्हाला लाज वाटते."- महेश तुंगार, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतचे पती
"आजवर अनेकदा आश्वासने मिळाली. पण प्रत्यक्षात नोकरी मिळेल का? याची शाश्वती अद्याप वाटत नाही. पण तारांकित प्रश्न उपस्थित झाल्याने त्यावर प्रशासनाला उत्तर द्यावे लागेल. त्यामुळे नाशिकच्या खेळाडूंना खरच नोकरी मिळणार का, याची आम्हाला प्रतीक्षा लागून आहे."
- दत्तु भोकनळ, आंतरराष्ट्रीय रोइंगपटू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.