Nashik MD Drug Case : दिल्लीतून अटक केलेल्या रोहितची केली स्पॉट व्हिजिट; ड्रगमाफिया ‘ललित’ला आणलेच नाही...

Drugs Crime
Drugs Crimeesakal
Updated on

Nashik MD Drug Case : राज्यभरातील बहुचर्चित एमडी ड्रग्ज प्रकरणी चेन्नईतून अटक करण्यात आलेला मुख्य संशयित ललित पाटील यास मुंबई पोलिस रविवारी (ता. २२) नाशिकला आणणार असल्याचे सांगितले जात होते.

प्रत्यक्षात दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या रोहित चौधरी यास शिंदेगावात स्पॉट व्हिजिटसाठी आणण्यात आल्याचा दावा नाशिक पोलिसांनी केला आहे. त्यामुळे ललितला नाशिकमध्ये तपासाकामी आणल्याची चर्चा अफवा ठरली. (Spot visit of Rohit who was arrested from Delhi md drug case nashik crime news)

मुंबई पोलिसांनी रोहित यास खासगी वाहनातून (एमएच ०३ डीएस ६७८४) आणले होते. शिंदेगावात काही मिनिटात स्पॉट व्हिजिट केल्यावर हे पथक कसारामार्गे मुंबईला परत माघारी गेल्याचे दिसून आले.

मुंबई पोलिस ललितला नाशिकला आणणार असल्याबाबत कोणतीही माहिती नाशिक पोलिसांना नव्हती. मात्र, मुंबई पोलिसांनी संशयित भूषण पानपाटील याचा साथीदार रोहित चौधरी यास दिल्लीतून अटक केली होती.

Drugs Crime
Nashik Drug Case: त्र्यंबकमध्ये परदेशी विद्यार्थ्यांची कसून तपासणी; MD ड्रग्सच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोहीम

भूषणने रोहितला एमडी ड्रग्ज बनविण्याचे प्रशिक्षण दिले होते. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या जिशानच्या मदतीने संशयित रोहित हा शिंदेगावातील कारखान्यात एमडी ड्रग्ज बनवत होता.

त्याच स्पॉट व्हिजिटसाठी त्यास नाशिकला आणण्यात आल्याचे समजते. रोहितला नाशिकला आणले; परंतु स्पॉट व्हिजिटवेळी मुंबई पोलिसांनी नाशिक पोलिसांना सामावून घेतले नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी रोहितसह ललितला आणले का, हा प्रश्न कायम आहे. मात्र, यातून पुन्हा मुंबई व नाशिक पोलिसांमधील समन्वयाचा अभाव दिसून आला.

Drugs Crime
Nashik MD Drug Case : छोट्या भाभीला ‘एमडी’ पुरविणाऱ्यास ठाण्यात अटक; ठाण्यातून नाशिकला पुरवठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.