Nashik News : श्री कपालेश्‍वर महादेव मंदिर जीर्णोद्धाराचे काम प्रगतिपथावर

Nashik News
Nashik News esakal
Updated on

नाशिक : लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंचवटीतील श्री कपालेश्‍वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतिपथावर आहे. महाशिवरात्रीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा मानस विश्‍वस्तांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी देताना ती संस्थेच्या अधिकृत कार्यालयात देऊन रीतसर पावती घ्यावी, असे आवाहन विश्‍वस्तांनी केले आहे.देशातील नंदी नसलेले एकमेव शिवालय अशी श्री कपालेश्‍वर महादेव मंदिराबाबतची आख्यायिका आहे. (Sri Kapaleshwar Mahadev Temple restoration work in progress Nashik News )

Nashik News
Nashik News : इगतपुरी- भुसावळदरम्यान तिसरी रेल्वेलाइन; नव्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी तरतूद

या मंदिराच्या कलशाच्या बाजूला तडे गेल्याने तो भाग किंचित कलला होता. त्यामुळे विश्‍वस्तांतर्फे मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले. मुंबईस्थित एका कंपनीला जवळपास चाळीस लाख रुपये खर्चाचे हे काम देण्यात आले असून,

त्यांना यापूर्वीही मंदिराच्या दुरुस्तीचा अनुभव असल्याने हे काम देण्यात आल्याचे विश्‍वस्तांनी सांगितले. हे काम येत्या महाशिवरात्रीपर्यंत पूर्ण करण्याचा मानस विश्‍वस्त ॲड. भाऊसाहेब गंभिरे व मंडलेश्‍वर काळे यांनी व्यक्त केला आहे. (Sri Kapaleshwar Mahadev Temple restoration work in progress Nashik News)

(हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस)

Nashik News
Nashik News : NMCला हवेत 12 सहाय्यक आयुक्त!

दरम्यान, मंदिराचा जिर्णोद्धार सुरू असून त्यासाठी काही दानशूरही पुढे येत आहे. मात्र या देणग्या बाहेरील कोणत्याही व्यक्तीकडे न देता मंदिराशेजारील देवस्थानच्या अधिकृत कार्यालयात जमा कराव्यात व त्याची रीतसर पावती घ्यावी, असे आवाहन विश्‍वस्तांनी केले आहे.

याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. यात कोणी अनधिकृतपणे देणग्या गोळा केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

Nashik News
Nashik News : वाहन स्मार्टकार्डची जीवघेणी प्रतीक्षा! नाशिक विभागात खासगी कंपनीच्या कामाचा नागरिकांना फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()