SSC Result Success : मजुरी करत त्याने घेतली दहावीच्या निकालात उंच भरारी!

Mohammad Alamgir Ansari
Mohammad Alamgir Ansariesakal
Updated on

SSC Result Success : शिक्षणाची आवड आणि काही करून दाखवण्याची जिद्द मनात असेल तर कुठेही परिस्थितीवर मात करता येते. शुक्रवार (ता.२) घोषित झालेल्या दहावीच्या निकालात ७१ टक्के गुण मिळवत नॅशनल उर्दू हायस्कूलच्या मोहम्मदआलमगीर अन्सारी विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखवले. (SSC Result success story of working hard boy mohammad ansari nashik news)

आयुष्याची पहिली पायरी म्हणून दहावी परीक्षेच्या निकालाकडे बघितले जाते. अशा या निकालात मोहम्मदआलमगीर अन्सारी याने ७१ टक्के गुण मिळवत नवीन आयुष्याची तसेच यशाची पहिली पायरी सर केली आहे.

वडाळा रोडवरील दुर्गम झोपडपट्टी म्हणून परिचित असलेल्या भारत नगर भागात तो कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. वडील मोहम्मदअमीरहुसेन अन्सारी ट्रक चालक आहे. महिनाभर ते शहराच्या बाहेर राहतात. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो.

मोठी बहीण बारावीत शिक्षण घेत आहे. एक लहान बहीण, आई आहे. अशात आलमगीरचे शिक्षण सुरू होते. अतिशय हलाकीच्या परिस्थितीत तो शिक्षण घेत होता. कुटुंबावर शिक्षणाचा ताण पडू नये.

तसेच चांगले शिक्षण घेऊन कुटुंबास या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा निश्चय करत आणि कुटुंबाच्या उदाहरनिर्वासाठी हातभार लागेल या उद्देशातून आलमगीर स्वतः शिक्षणासह मजुरी करत होता. मिळेल त्यावेळेस पीओपीच्या कामास जाऊन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून घराचा उदरनिर्वाह चालवत शिक्षण घेत होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mohammad Alamgir Ansari
Success Story: 9-5 जॉब करुन आयुष्य वाया घालवताय म्हणणारा तो वयाच्या 23व्या वर्षी करोडपती

दिवसभर शाळा सायंकाळी पीओपीसह इतर विविध प्रकारचे कामे करत होता. काम आणि शाळा यामुळे त्यास अभ्यासास देखील वेळ मिळत नसे. अशा वेळेस पहाटे आणि शाळेतील फावल्या वेळात त्याच्याकडून अभ्यास केला जात होता. त्याचप्रमाणे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मोठ्या बहिणीची प्रेरणा यातून त्याने दहावीच्या परीक्षेत ७१ टक्के गुण मिळवत करून मोठे यश प्राप्त केले.

पुढे वाणिज्य शाखेत उच्च शिक्षण घेऊन मोठा व्यावसायिक होण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. विशेष करून कृषी व्यवसायात नावलौकिक करण्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या यशाबद्दल पालक परिसरातील नागरिक आणि शिक्षकांनी त्याचे कौतुक केले.

Mohammad Alamgir Ansari
SSC Result Success : रसवंतीगृह चालवून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या अविनाशने दहावीच्या परीक्षेत मिळविले यश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.