Nashik News : कष्टाची शिदोरी बरोबर घेत आर्थिक परिस्थितीवर मात करत ३७ जणांनी शिक्षणाची कास धरली. काबाडकष्ट करून कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले.
केवळ परिस्थितीचे रडगाणे करून यश मिळत नाही. तर शिक्षणाची कास धरत काटेरी मार्गावर चालून यश पदरात पाडावे लागते. हे दाखवून देण्याचे काम या ३७ जणांनी आपल्या कृतीतून केले. (ssc success story 37 people succeeded in 10th exam nashik news)
शिका, संघर्ष करा यातून हमखास यश प्राप्त होते. हे वाक्य सत्यात उतरविण्याचे काम नॅशनल उर्दू हायस्कूलमधून दहावीची परीक्षा देत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या ३७ विद्यार्थ्यांनी केले. अनेकांची आर्थिक परिस्थिती उत्तम असते.
त्यांना शिक्षणाची आवड नसते. तर ज्यांना शिक्षणाची आवड असते. अशा अनेकांची शिक्षण घेण्याची परिस्थिती नसते. तरीदेखील त्यातील काही जण खचून न जाता आलेल्या परिस्थितीला सामोरे जात यश संपादन करत असतात. हे सर्व विद्यार्थी त्याचे उत्तम उदाहरण आहे.
घराची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाहाची जबाबदारी सांभाळत यांनी कष्ट करत शिक्षणाची कास धरून ठेवली. यातील १० विद्यार्थी अल्पवयीन आहेत. त्यांनी नियमित शाळेत प्रवेश घेतलेला होता. तर अन्य २७ विद्यार्थी तरुण आणि वयस्कर आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यांनी १७ नंबरचा फॉर्म भरून अर्थात बाहेरून परीक्षा दिली होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी नियमित शाळेतील १० विद्यार्थी दैनंदिन शाळेत येत असतं. शाळेच्या वेळा व्यतिरिक्त अन्य वेळेत या विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे कामे मोल मजुरी केली जात होती.
सकाळ सायंकाळचे काबाडकष्ट आणि दिवसभराची शाळा असा क्रम असताना देखील या विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करत दहावीच्या निकालात घवघवीत यश प्राप्त केले.
त्याचप्रमाणे कमी वयात संसाराचे ओझे खांद्यावर पडले. आर्थिक परिस्थिती हालाखीची अशात अनेकांना अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागले. शिक्षणाचे स्वप्न आणि समाजात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द उराशी बाळगून या ३३ जणांनी नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये १७ नंबरचा फॉर्म भरून दहावीच्या परीक्षा दिली.
दिवसरात्र काबाडकष्ट करून आणि संसाराची जबाबदारी सांभाळत त्यातील २७ जणांनी उत्तम पद्धतीचे गुण प्राप्त करून आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले. यापुढेही अशाच पद्धतीने कष्टाची शिदोरी बरोबर घेऊन उच्च शिक्षण घेण्याच्या प्रतिक्रियाही या विशेष विद्यार्थ्यांनी दिल्या.
नियमित शाळेतील कष्टकरी विद्यार्थी
अलकैफ खान (७१ टक्के), महम्मदअलमगीर अन्सारी (७१ टक्के), महम्मद शाहजाद खान (६३.६० टक्के), मोहम्मदरबी अन्सारी (५७.५० टक्के), अलीमुजाहिद अकबर (४७.८० टक्के), हसनेन शेख (५०.४० टक्के), आयन खालिक(५२.८० टक्के), अमीन खलिफा (४६.२० टक्के), मुजमिल मिर्झा (४९.८० टक्के), मुस्तकीम शेख (४० टक्के)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.