Nashik Accident News : देवळा-कळवण रस्त्यावर एसटीचा अपघात; 15 प्रवासी जखमी

देवळा शहरानजीक असलेल्या सप्तश्रृंगीनगर जवळ कळवण -मालेगाव ही बस (एमएच०७ सी ९१०८) गुरुवार (ता.४) रोजी सायंकाळी झाडावर आदळल्याने अपघात झाला.
Bus accident near Saptsringi Nagar on Devla Kalwan road here
Bus accident near Saptsringi Nagar on Devla Kalwan road hereesakal
Updated on

Nashik Accident News : देवळा शहरानजीक असलेल्या सप्तश्रृंगीनगर जवळ कळवण -मालेगाव ही बस (एमएच०७ सी ९१०८) गुरुवार (ता.४) रोजी सायंकाळी झाडावर आदळल्याने अपघात झाला.

यामध्ये चालक-वाहकासह बसमधील जवळपास १६ प्रवाशी जखमी झाल्याने त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. (ST bus accident on Deola Kalwan road nashik news)

प्राथमिक माहितीनुसार बसमध्ये काही बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्यातून हा अपघात झाला. टायर फुटल्यामुळे बस झाडावर आदळली. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी कळवण, नाशिक, मालेगाव, चांदवड या ठिकाणी संदर्भित करण्यात आले. देवळा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कळवण डेपोची कळवण-मालेगाव बस गुरुवार (ता.४) रोजी देवळा शहरात प्रवेश करण्यापूर्वी सप्तश्रृंगीनगराजवळ वेगाने येत असताना पहिल्यांदा उजव्या साईडच्या विजेच्या खांबाला धडक देत व त्यांनतर डाव्या बाजूच्या चिंचेच्या झाडावर धडकली.

सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बसची पुढच्या बाजूचा चक्काचूर झाला असून बसचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळेस या बसच्या मागेपुढे कोणतेही वाहन नसल्याने दुर्घटना टळली.

Bus accident near Saptsringi Nagar on Devla Kalwan road here
Nashik Accident News: येवल्याजवळ अपघातात शहाद्याचे 8 जखमी; टाटा मॅजिक, इरटीका कारची समोरासमोर धडक

या अपघातात जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे :

राहुल राजू कचवे (वय ३०) चांदवड, वाय एस महाले वाहक( वय ३०) सुरगाणा, अकबर अली शहा ५० मालेगाव, भिका रुपसिंग सोळंके ७५ नवेगाव, अरविंद गणपतराव जोंधळे ६५ कोल्हापूर, पांडुरंग शंकर साठे ६४ गडहिंग्लज, पुरुषोत्तम देवबा ठाकरे चालक वय ४६ कळवण, हर्षल युवराज पगार २० खुंटेवाडी, कोमल विकास शिरसाठ २० देवळा.

मोहम्मद मनु २५ मुझफ्फरनगर, सविता भावराव सूर्यवंशी ४३ देवळा, ओंकार बाबासाहेब येरुळे २० राहुरी, मेहेरदिन अब्दुल गफर ३४ मुझफ्फरनगर, आकाश कृष्णा गांगुर्डे २४ देवळा, लखन हरी सोनवणे ४० कळवण, योगिता लखन सोनवणे ३५ कळवण, उषाबाई पोपट थोरात ४८ पिंपळगाव वा.

प्राथमिक उपचार केल्यावर गंभीर जखमींना कळवण, मालेगाव, नाशिक, चांदवड या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. जखमींना बसमधून बाहेर काढत दवाखान्यात नेण्यासाठी संभादादा मित्रमंडळ, शिवराजे मित्र मंडळ यांच्यासह इतरांनीही तातडीची मदत करण्याचे सहकार्य केले. याशिवाय येथील देवळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचीही मोलाची मदत मिळाली.

यावेळी तहसीलदार विजय सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, ज्योती गोसावी, आगारप्रमुख संदीप बेलदार, राजेंद्र आहिरे उपस्थित होते. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Bus accident near Saptsringi Nagar on Devla Kalwan road here
Nashik Accident News : ट्रॅक्टरच्या धडकेत चिमुकला ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com