Nashik : जायकवाडीतील साठा विसर्ग सोडण्याच्या टप्प्यावर

Jayakwadi Dam latest marathi news
Jayakwadi Dam latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने पुन्हा संततधार (Constant rain) हजेरी लावण्यास सुरवात केल्याने २४ तासांत नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग (Discharge) २८ हजार ५३ वरून ३९ हजार ३३८ क्यूसेकपर्यंत नेण्यात आला.

अशातच मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील साठा ७३.९७ टक्क्यांपर्यंत सोमवारी (ता. १८) दुपारपर्यंत पोचला होता. (stage of discharge of water stock in Jayakwadi nashik latest marathi news)

जायकवाडीमधील पातळी ४६२.३४ मीटर म्हणजे, इशारा स्थितीच्या पुढे गेल्याने या धरणातून विसर्ग सोडण्याच्या टप्प्यावर जलसाठा पोचला आहे. जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी गोदावरी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेची सूचना दिली, तसेच स्थानिक प्रशासनातर्फेही सूचना देण्यात आल्या.

जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जायकवाडी धरणाच्या दरवाजातून गोदावरीमध्ये विसर्ग करावा लागणार आहे. गोदावरीमधून जायकवाडीकडे नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून सोमवारी सकाळपर्यंत २९.१०६ टीएमसी पाणी रवाना झाले, तर गोदावरीत दारणा धरणातून ६.८०, गंगापूरमधून ४.१० टीएमसी, तर कडवामधून १.८५ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला.

जायकवाडीतील साठा सोमवारी दुपारी ७३.९७ टक्क्यांपर्यंत पोचला, तर धरणात ३६ हजार २०६ क्यूसेक पाण्याची आवक झाली. गेल्या वर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यानंतर जायकवाडीतील साठा ३६ टक्क्यांपर्यंत होता.

जायकवाडी धरण सलग चौथ्या वर्षी ‘फुल’ होण्याच्या दिशेने आहे. या धरणात मेंढीगिरी समितीच्या शिफारशीनुसार आवश्‍यक असलेला ६५ टक्के साठा यंदा पहिल्यांदा ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या अगोदर झाला आहे.

३१ जुलैपर्यंत जायकवाडीमध्ये ७९ टक्के साठा ठेवता येतो. मात्र, नाशिक आणि नगर जिल्ह्यात संततधार सुरू असल्याने आणखी १३ दिवस एवढा साठा कसा सांभाळायचा, असा प्रश्‍न निर्माण झाल्याने विसर्ग सोडण्याबाबत जलसंपदा विभाग निर्णय घेणार आहे.

Jayakwadi Dam latest marathi news
मौजमजेसाठी करायचे दुचाक्यांची चोरी; चौघे गजाआड

जायकवाडी धरणाबाबत

स्थिती पाण्याची पातळी विसर्ग क्यूसेकमध्ये

इशारा ४४०.४१ मीटर ३२८४.७५

धोका ४४१.९३ ५२१०.२९

Jayakwadi Dam latest marathi news
Corona Update : जिल्‍ह्यात 188 कोरोनामुक्‍त; 86 पॉझिटिव्‍ह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.