Nashik News : उड्डाणपुलाचे रखडलेले काम सुरू; मालेगाव महापालिका

शहरातील जुन्या महामार्गावरील बहुप्रतिक्षित उड्डाण पुलाच्या अंतिम टप्प्यातील कामासाठी नवीन बसस्थानक ते दरेगावपर्यंत अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.
An arch erected by the municipal administration near the new bus stand to provide one-way traffic for heavy vehicles
An arch erected by the municipal administration near the new bus stand to provide one-way traffic for heavy vehiclesesakal
Updated on

Nashik News : शहरातील जुन्या महामार्गावरील बहुप्रतिक्षित उड्डाण पुलाच्या अंतिम टप्प्यातील कामासाठी नवीन बसस्थानक ते दरेगावपर्यंत अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.

अखेरच्या टप्प्यातील स्लॅब व अन्य कामासाठी एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. (Stalled work on flyover resume by Malegaon Municipality nashik news)

दुचाकी व लहान कार व तत्सम चारचाकी वाहनांसाठी हा मार्ग खुला आहे. अवजड वाहनांमध्ये बससाठी एकेरी मार्ग झाल्याने प्रवाशांना मार्ग बदलामुळे भाडेवाढीचा नाहक भुर्दंड बसला आहे. शहरात धुळे बाजूकडून येणाऱ्या बसेसला एकेरी मार्गाने प्रवेश दिला जात आहे. येथील बसस्थानकातून धुळे, जळगाव, चाळीसगावकडे बाहेर जाणाऱ्या सर्व बस मोसमपूल मार्गे बायपासने मनमाड चौफुलीकडून जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गातील हा बदल कायम राहणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक देवेन्द्र शिंदे यांनी दिली. ‘सकाळ’ने १३ डिसेंबरला उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना उपाययोजना न केल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात ‘वाहतूक कोंडीची समस्या बनली अधिक जटील’ या आशयाचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.

त्याचवेळी एकेरी मार्ग व अन्य उपाययोजना सुचविल्या होत्या. उशिरा का होईना अंमलबजावणी झाल्याने आता पुलाचे काम वेगाने मार्चअखेर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील जुन्या आग्रा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने अवजड वाहनांसाठी नवीन बसस्थानक ते दरेगावपर्यंतचा मार्ग बंद करण्यात आला.

An arch erected by the municipal administration near the new bus stand to provide one-way traffic for heavy vehicles
Nashik News : माळमाथ्यावर गावोगावी मिळतोय सुकामेवा; जळगावकडील विक्रेत्यांची भटकंती

महानगरपालिका प्रशासनाने बसस्थानकाजवळ जाणाऱ्या मार्गावर लोखंडी कमान उभारून मोठ्या वाहनांना अटकाव केला आहे. कमानीखालून दुचाकी, तीन चाकी व चारचाकी हलकी वाहने विनासायास जातील अशा उंचीची ही कमान आहे. धुळे, चाळीसगाव, पाचोरा, शिरपूर, जळगाव, भुसावळ, चोपडा, शहादा, नंदुरबारकडून येणाऱ्या बस शहरात प्रवेश करताना दरेगाव ते नवीन बसस्थानकापर्यंतच्या एकेरी मार्गाचा अवलंब करतील.

धुळ्याकडे जाणाऱ्या बस नवीन बसस्थानकातून जुन्या शिवाजी महाराज पुतळा, मोसमपूल मार्गे मनमाड चौफुलीने बायपासने जातील. बसचालक व वाहकचालकांनी सुचविलेल्या मार्गानेच आपल्या वाहनांची वाहतूक करून वाहतूक शाखेस सहकार्य करावे असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही संबंधित सर्व आगारांना माहिती देणारे परिपत्रक प्रसिद्ध करून पाठविले आहे.

बसभाड्यामध्ये अल्पशी वाढ

शहरातील उड्डाणपुलाच्या अंतिम टप्प्यातील कामामुळे होणाऱ्या मार्ग बदलामुळे धुळे व चाळीसगाव रस्त्याने जाणाऱ्या बसच्या अंतरात ९.३ किलोमीटर म्हणजेच दीड टप्प्याची वाढ होत आहे. मार्ग बदलामुळे विभागाच्या वाहनावरील फेऱ्यांच्या किलोमीटर व प्रवासभाडे टप्प्यांमध्ये आवश्‍यक तो बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दलामुळे धुळे, चाळीसगाव, पाचोरा, शिरपूर, जळगाव, भुसावळ, चोपडा, शहादा, नंदुरबारकडे जाणाऱ्या तिकिटाच्या दरात सरासरी दीड टप्प्यामुळे पंधरा रुपये वाढ होणार आहे.

महामंडळातील सर्व विभागांनी मार्गावरील टप्पा व दरपत्रक बदलासंदर्भात बदल करून घेण्याच्या सूचना नाशिक विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी या पत्रकात दिल्या आहेत. आदेशाच्या प्रती राज्यातील सर्व विभागांना पाठविण्यात आल्या आहेत. ४ जानेवारीपासून या बदलाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

An arch erected by the municipal administration near the new bus stand to provide one-way traffic for heavy vehicles
Nashik News: हे काम आमचे नव्हेच...! राज्यपालांच्या दौऱ्यात शासकीय यंत्रणेत असमन्वय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.