नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू करा; पालकमंत्र्यांना विनंती

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला व कांदा उत्पादक असल्याने अकरा दिवस बाजार समित्या बंद राहिल्या, तर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होईल.
 Vegetables
Vegetables e-sakal
Updated on

वणी/दिंडोरी (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्यात बुधवार (ता.१२)पासून २३ मेपर्यंत लॉकडाउन(Lockdown) लागून करण्यात आला आहे. कोरोनाचा(Corona) प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. बाजार समित्या(Market Committees) बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला(Vegetables) व कांदा(Onion) उत्पादक असल्याने अकरा दिवस बाजार समित्या बंद राहिल्या, तर शेतकऱ्यांचे(Farmers) अतोनात नुकसान होईल. यामुळे कठोर निर्बंध घालून का होईना पण बाजार समित्या सुरू कराव्यात, अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी पालकमंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांना पत्राद्वारे केली आहे. (Start market committees in Nashik district following the rules)

भाजीपाल्याची साठवणूक अशक्यच!

भाजीपाला नाशवंत असतो, तो खराब होईल. मान्सून डोक्यावर आल्यामुळे व अवकाळी पाऊस(Unseasonal rain) सतत पडल्यामुळे शेतात कांदा जास्त दिवस शेतकऱ्यांना ठेवणे शक्य नाही. बाजार समित्या पुन्हा अकरा दिवसांनी सुरू झाल्यावर आवक वाढून कांद्याचे भाव पडण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी भरडले जातील. म्हणून कठोर नियम पाळून मार्केट सुरू करावे. हवे तर त्याला पर्यायी व्यवस्था निर्माण करावी. शहराबाहेर खुल्या मैदानात बाजार भरवावा. कांदा लिलावावेळी सुद्धा बाजार समितीत गर्दी होत असेल तर पर्यायी जागेत सुद्धा लिलाव करावेत, असे या पत्रात सुचवण्यात आले आहे.

 Vegetables
Nashik Lockdown : टवाळखोरांना पोलिसांकडून दंडूक्याचा प्रसाद! पाहा VIDEO

''नाशिक जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे प्रशासनाने जे पाऊल उचलले त्याचे आम्ही अंशतः स्वागत करतो. परंतु, बाजार समित्या पूर्ण बंद ठेवल्या तर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होईल. विशेषतः भाजीपाला व कांदा उत्पादक देशोधडीला लागतील. म्हणून कडक नियम करून व पर्यायी व्यवस्थेचा आधार घेऊन बाजार समित्या तत्काळ सुरू कराव्या. शेतकरी निश्‍चित सर्व नियम पाळतील.''

- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 Vegetables
महाराष्ट्रात लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()