Gram Swachhta Survey : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्रामस्वच्छता स्पर्धेसाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे गावांचे सर्वेक्षण सुरू असून, ते ३ ऑगस्टपर्यंत असेल.
प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे १५ ग्रामपंचायतींची प्राथमिक निवड होईल. त्यानंतर विभागीय स्पर्धेसाठी तीन ग्रामपंचायतींची अंतिम निवड केली जाईल. (Start of Gram Swachhta survey 3 best Gram Panchayats of district will be selected nashik)
ग्रामीण भागातील जनतेचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धा सुरू केली. ती जिल्हा, विभागीय व राज्य पातळीवर आयोजित केली जाते. राज्य पातळीवर पारितोषिक मिळविणाऱ्या ग्रामपंचायतींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविले जाते.
पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना अधिक निधी देऊन प्रोत्साहनही दिले जाते. यामुळे गावांमध्ये स्वच्छतेसाठी स्पर्धा लागली. एकदा पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतींना या स्पर्धेत दुसऱ्यांदा सहभाग घेता येतो; त्याच क्रमांकाचे पारितोषिक दिले जाते.
मात्र, बक्षीस स्वरूपात मिळणारी रक्कम ग्रामपंचायतीला मिळत नाही. त्यामुळे स्वच्छता विभागाला नवीन ग्रामपंचायतींचा शोध घेऊन त्यांना सहभागी करून घेण्यासाठी आता गावोगावी जाऊन सर्वेक्षण करावे लागत आहे.
पहिल्या १५ ग्रामपंचायतींची निवड झाल्यावर तीन ग्रामपंचायती विभागीय स्तरापर्यंत पोचतील. विभागीय स्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायती राज्य स्तरावर पोचतात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सर्वेक्षणात काय पाहिले जाते?
- गाव १०० टक्के हागणदारीमुक्त हवे, गांडूळखत निर्मिती प्रकल्प गरजेचा.
- गटारी बंदिस्त हव्यात, सांडपाण्याचे व्यवस्थापन व परसबागांची निर्मिती
- किती वृक्षलागवड केली, प्रत्येक घरी शौचालये अन वापर होतो का?
- नदीत कचरा टाकू नये यासाठी जॉगिंग ट्रॅकनिर्मिती, स्वच्छता कशी केली जाते?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.