इस्लामीक नवीन वर्षास प्रारंभ; 9 ऑगस्टला मोहरम

Moharram latest marathi news
Moharram latest marathi newsesakal
Updated on

जुने नाशिक : इस्लामिक नवीन वर्षास शनिवार (ता. ३०) सायंकाळपासून प्रारंभ झाला. इस्लामिक कालगणनेतील शेवटचा महिना जिलहजची शनिवारी ३० तारीख होती.

त्यानिमित्ताने शहर परिसरात मोहरम महिन्याचे चंद्रदर्शन झाल्याने इस्लामी नववर्ष १४४४ ला सुरवात झाली आहे. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावरही नवीन वर्षाचे संदेश झळकले. (Start of Islamic New Year Muharram on August 9 nashik Latest Marathi News)

पवित्र मोहरमचा सण (अशुरा) मंगळवारी (ता. ९) साजरा होणार आहे, अशी माहिती शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन खतीब यांनी दिली.

शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी चंद्रदर्शन झाले नाही. यामुळे शनिवारी जिलहजची ३० तारीख असल्याने सायंकाळ (मगरीब)पासून नववर्षास सुरवात झाल्याचे स्थानिक चांद कमिटीतर्फे सांगण्यात आले. मोहरमनिमित्त शहरातील विविध भागांमध्ये शोहदा-ए-करबला यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ दहादिवसीय प्रवचन सुरू झाले आहे.

Moharram latest marathi news
Nashik : पाणीगळतीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कोरोना संसर्गामुळे दोन वर्षे बंद असलेली प्रवचन मालिका यंदापासून पुन्हा सुरू झाली. बागवानपुरा चौक, कोकणीपुरातील दख्नीपुरा चौकात दररोज रात्री नऊला प्रवचन होत आहे, अशी माहिती शाह सादिक ॲकॅडमीतर्फे साकीब भुरे यांनी दिली. सारडा सर्कल परिसरातील मनोहर मार्केटमधील मदरसा सरकार-ए- कलाॅ येथे रात्री साडेनऊपासून महिलांसाठी प्रवचन होत आहे.

मशीदमध्ये कुराणखाणी होत आहे. सारडा सर्कल परिसरातील इमामशाही येथे ऐतिहासिक ‘हालो का ताजिया’ या ताबूताचे निर्माण कार्य सध्या सुरू असून, ९ ऑगस्टला येथे जत्रा भरणार आहे, अशी माहिती मुजीब सय्यद यांनी दिली.

दरम्यान, मोहरम काळात सर्वांनी कायद्याचे पालन करावे, कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांनी केले आहे. दरम्यान मोहरम सणानिमित्त भद्रकाली हद्दीत ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

Moharram latest marathi news
पौरोहित्‍यातही महिलाराज : मंत्रोच्चाराचा आरोग्‍यावर सकारात्‍मक परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.