नाशिक : वाहनांपासून होणारे हवा प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून विविध पर्याय शोधले जातात. वाहनांपासून निघणाऱ्या धुरामुळे मनुष्यासह निसर्गाचीदेखील हानी होऊ लागली आहे, त्यातच इंधनाचे वाढणारे दर हे डोकेदुखी ठरत आहे.
यावर ग्राहकांची आर्थिक बचत आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नाशिकच्या युवकांनी इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी ‘रिव्हॅम्प मोटो’ दुचाकी बाजारात आणली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी (ता.१८ ) वाहनांचे अनावरण होऊन पहिले वाहन रस्त्यावर उतरले. (Startup of Revamp Moto by youth of Nashik electric vehicle Unveiled by Nitin Gadkari Nashik News)
रिव्हॅम्प मोटो इलेक्ट्रिक व्हेईकल तासी २५ किलोमीटर वेगाने धावणारी बाईक आहे. एकदा चार्जिंग केल्यास ७० किलोमीटरचा प्रवास वाहनधारकांना करता येणार आहे. सव्वाशे किलो वजनाची पेलोड क्षमता या वाहनाची आहे.
बारा इंचांची चाके, ४८ व्होल्ट २५ ॲम्पिअर क्षमता आहे. पावण तीन तासात या गाडीची बॅटरी पूर्णपणे चार्जिंग होणार आहे. विशेष म्हणजे रिव्हेंप मोटोची ‘बडी २५’ ही ट्रान्सफॉर्मेबल इलेक्ट्रिक व्हेईकल स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि मॉड्युलर सिस्टीमने जोडण्यात आली आहे.
हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...
ही गाडी चालवण्यासाठी कोणत्याही नोंदणीची आणि वाहन परवान्याची आवश्यकता नाही. या वेळी जयेश टोपे, पुष्कराज साळुंखे , प्रीतेश महाजन, प्रणव रावल, रिद्धी महाजन, हर्षल चित्ते, शुभम अहिरे उपस्थित होते. इलेक्ट्रिक व्हेईकलची पाहणी करून केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गाडीचे फीचर्स जाणून घेतले.
"भारतीय बनावटीची इलेक्ट्रीक व्हेईकल असल्याने गाडीतील बॅटरी ही लिथियम आयोन तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली असून ती वॉटरप्रूफ आहे. त्यामुळे आता भारतात अशा इंधनमुक्त गाड्यांना सर्वात जास्त वाव भविष्यात राहील."
- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.