Nashik News : मनातल्या विचारांवर आधारलेले चेटूकवारं; राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

Rajya Natya Haushi Spardha
Rajya Natya Haushi Spardhaesakal
Updated on

नाशिक : विल्यम शेक्सपियरचे मुळ नाटक ‘द टेम्पेस्ट’ या नाटकाचे प्रा. दिलीप जगताप यांनी केलेले भाषांतर म्हणजे ६१ व्या मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेतील सादर झालेले नाटक चेटूकवारं. ६१ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रविवारी (ता.२७) नम्रता कलाविष्कार बहुउद्देशीय संस्थेचे दिलीप जगताप लिखित राजेश टाकेकर दिग्दर्शित चेटूकवारं नाटक सादर केले.

प्रत्येक माणसाच्या मनात चांगले व वाईट विचार येत असतात. माणूस विचार दडपून ठेवण्याचा प्रयत्न करत असला तेवढेच ते उसळून बाहेर येण्याचा प्रयत्न करते. बाहेर आल्यावर ते माणसावर अधिराज्य गाजवू इच्छिते. यातील जो विचार अधिक प्रबळ तो विचार व्यक्तीचा ताबा घेतो. यातून माणूस बरे वाईट यांचा विचार न करता कृत्ये करतो.

मात्र या सगळ्यांवर चांगला विचार मात करतो. माणसाच्या मनातील विचारांची आंदोलने, त्याची स्वप्ने, चांगले वाईट प्रसंग यातून तो स्वतःच्या कल्पनेतील जग निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. जिथे तो महत्त्वाचा ठरतो. राज्य बळकवाण्याच्या ईर्षेतून कुटुंबातील सदस्यांचा छळ करणे अन् स्वतःच अस्तित्व तयार करणे असे याचे कथानक. पुढे एका पिढीने केलेल्या कृत्याची जेव्हा पुनरावृत्ती होऊ लागते.(State Amateur Marathi Drama Competition Chetukvar play performed Nashik News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Rajya Natya Haushi Spardha
Nashik News : तालुकानिहाय 100 बड्या थकबाकीदारांची नावे जाहीर

तेव्हा मात्र या वाईट विचारावर चांगल्याचा विजय होतोच असा संदेश प्रेक्षकांना चेतूकवारं देऊन जाते. नाटकाचे नेपथ्य चंद्रकांत जाडकर तर प्रकाशयोजना विनोद राठोड यांची आहे. पात्रांच्या वेशभूषा हरिकृष्ण डीडवणी तर रंगभूषा माणिक कानडे यांनी केली.

विक्रम गवांदे यांनी या नाटकाला संगीतबद्ध केले. या नाटकात प्रॉस्पेरो जय शुक्ल, एरियल सोनाली गायकवाड, मिरांडा वैष्णवी ताम्हनाकर, फार्डिंनांड ऋषिकेश रोटे, गोनझालो रवींद्र ढवळे, ऍलंसो विवेकानंद भट, अंड्रीयन अरुण भावसार, अँटीनिओ प्रबुद्ध मागाडे, सॅबेस्टीन सचिन दलाल, कॅप्टन लक्ष्मीकांत पवार, मुख्य खलाशी हरिकृष्ण डिडवानी, ओम शेवाळे, हरीश परदेशी, मुरलीधर जगताप, ट्रिंकोलो संजय साळवे, स्टीफेनो केदार रत्नपारखी, कॅलिबन राजेश टिकेकर यांनी भूमिका साकारल्या.

आजपासून सांस्कृतिक विभागीय कार्यक्रम

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत १६ नाटके आतापर्यंत सादर झाले. सोमवारी (ता. २८) पासून शुक्रवारी (ता.२) पर्यंत सांस्कृतिक विभागीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ३ डिसेंबरला मराठा विद्या प्रसारक संस्थेचे उलगुलान हे नाटक सादर होईल. उलगुलान नाटकाचे लेखन मुकुंद कुलकर्णी यांनी केले असून तेजस बिल्दीकर यांनी दिग्दर्शित केले आहे.

Rajya Natya Haushi Spardha
Nashik News : जिल्ह्यातील आंतरराज्य सीमांवर नाकाबंदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()