Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या 21 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा थांबवण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Jal Jeevan Mission News
Jal Jeevan Mission Newsesakal
Updated on

Jal Jeevan Mission : केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ उपक्रमात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ ३१ जुलैला पूर्ण होत असल्याने त्यांची सेवा थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दहा महिन्यांपासून त्यांचे वेतनही थकले आहे. (state government decision to terminate services of 21 contract employees of Jal Jeevan mission nashik news)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दोन वर्षांपूर्वी जलजीवन मिशन योजनेची घोषणा करण्यात आली. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेने आउटसोर्सिंगद्वारे कंत्राटी अभियंत्यांची नियुक्ती केली. ग्रामीण भागातील जनतेला थेट घरात नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर सोपवली होती.

या विभागाकडे मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने खासगी कंपनीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने कनिष्ठ अभियंत्यांची मानधनावर नियुक्ती केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jal Jeevan Mission News
Nashik News : जिल्ह्यातील 3900 कर्मचाऱ्यांना आज निवृत्तिवितेन

त्यांच्याकडून वर्षभरात विविध ठिकाणी कामे करून घेण्यात आली. गेल्या ऑक्टोबरपासून या कर्मचाऱ्यांना मानधनही मिळालेले नाही.

कधीतरी मानधन मिळेल, या आशेवर हे कर्मचारी दहा महिन्यांपासून कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकाळ ३१ जुलैला पूर्ण होत आहे. त्यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच केंद्र सरकारकडून पैसे प्राप्त झाल्यानंतर त्यांचे थकीत वेतन दिले जाणार आहे. त्यापोटी ७० लाख रुपयांची मागणी केली आहे.

Jal Jeevan Mission News
Jal Jeevan Mission Scheme : जलजीवन मिशन खर्चात नाशिक जिल्हा अव्वल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()