Nashik MVP News : ‘बहुजन हिताय-बहुजन सुखाय’चा नवा अध्याय; ‘मविप्र’ साकारणार अत्याधुनिक वसतिगृह

बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गरज भागविण्यासाठी नाशिक येथे वसतिगृह सुरू करावे, या विचाराने पाच विद्यार्थ्यांपासून उदोजी महाराज बोर्डिंगची सुरवात झाली.
Adv. Nitin Thackeray
Udoji Maratha Boarding Time.
This will be the new building of the hostel.
Adv. Nitin Thackeray Udoji Maratha Boarding Time. This will be the new building of the hostel.esakal
Updated on

Nashik MVP News : बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गरज भागविण्यासाठी नाशिक येथे वसतिगृह सुरू करावे, या विचाराने पाच विद्यार्थ्यांपासून उदोजी महाराज बोर्डिंगची सुरवात झाली.

मराठा वसतिगृह म्हणजे नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक पर्वाची सुरवातच होय. यारूपाने जिल्ह्यात मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. (state of art hostel will be realized by MVP nashik news)

आज त्याच जागेमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधांयुक्त विद्यार्थी वसतिगृहाचे भूमिपूजन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. संस्थेचे सभासद, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. दि वसेंदिवस जमिनीची उपलब्धता कमी कमी होत आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या जागेचा वापर योग्य पद्धतीने होण्याची गरज आहे. आडव्या पद्धतीच्या इमारतींमध्ये जागा अधिक वापरली जाते.

त्यामुळे उभ्या उंच इमारती कमी जागेत अधिकाधिक क्षमता वाढवितात. मुंबईमध्ये हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. पुण्यामध्येही त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. आपणही नाशिकच्या दृष्टीने तशी सुरवात करायला हवी, म्हणूनच एक पाऊल पुढे येऊन कमी जागेत उंच असे प्रशस्त १३ मजली मुलांचे वसतिगृह सुरू करीत आहोत. जेणेकरून संस्थेकडे उर्वरित असलेल्या जागेत संस्थेच्या हिताच्या दृष्टीने नवनवीन संकल्पना राबविता येतील.

‘मविप्र’चा विस्तार प्रचंड आहे. आमच्या ४९२ शाखांच्या माध्यमातून जवळपास अडीच लाख विद्यार्थी उच्च गुणवत्तापूर्वक शिक्षण घेत आहेत. सर्व जाती- धर्माच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी ही महाराष्ट्रातील नामांकित संस्था आहे. बारा हजार कर्मचारी, दहा हजार ‘मविप्र’ची सभासद सदस्यसंख्या आहे. ‘मविप्र’तून शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व निर्माण करणारे असंख्य आहेत. नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात ‘मविप्र’चा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण भागात अतिदुर्गम भागातही ‘मविप्र’ने गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी हक्काचे शिक्षण उपलब्ध करून दिले आहे.

Adv. Nitin Thackeray
Udoji Maratha Boarding Time.
This will be the new building of the hostel.
Nashik : यंदा ‘MVP’ सभासद देणार 21 मते

गंगापूर रोड परिसरात मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर बाबूराव ठाकरे इंजिनिअरिंग महाविद्यालय, पॉलिटेक्निक, एमबीए, लॉ, आर्किटेक्चर, ॲग्री व सीएमसीएस कॉलेज आहेत. त्याचबरोबर आयटीआय, होरायझन ॲकॅडमी, न्यू मराठा हायस्कूल ही याच परिसरात आहे, म्हणजेच ‘केजी टू पीजी एज्युकेशन’ या परिसरात उपलब्ध आहे. राज्याबरोबरच देशभरातून येथे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात.

जवळपास सहा हजार सातशे वेगवेगळे प्रोफेशनल शिक्षण हे विद्यार्थी घेत आहेत. हा परिसर नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेला आहे. या भागात रूम अथवा फ्लॅट घेऊन राहणे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. संस्थेच्या माध्यमातून वसतिगृह झाले पाहिजे ही मागणी आधीपासूनच होती. संस्थेचे सभासद, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेता वसतिगृह निर्माण करण्याचे ठरविले व आज त्याची भूमिपूजनाने सुरवात होत आहे.

वसतिगृह इमारत झाल्यानंतर त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देताना संस्थेच्या सभासद, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पाल्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाईल. विद्यार्थी आमच्या संस्थेत शिक्षण घेण्याबरोबरच त्यांची सुरक्षितता हा फार महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांचा प्रवेश जर वसतिगृहात असेल, तर विद्यार्थी कॉलेज व वसतिगृह या पलीकडे त्याचा जास्त वेळ बाहेर जात नाही. त्यामुळे तो आपल्या शैक्षणिक उद्देशापासून विचलित होण्याचे प्रमाण कमी असेल. संपूर्ण लक्ष आपल्या अभ्यासावर केंद्रित होण्यास मदत होईल. वसतिगृहात रेक्टर, सिक्युरिटी सीसीटीव्ही असल्यामुळे

Adv. Nitin Thackeray
Udoji Maratha Boarding Time.
This will be the new building of the hostel.
Nashik News: MVP ‘डिलिजंट बॅच'तर्फे व्यावसायिक शिक्षण; 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना विशेष वर्गासाठी प्रवेश

शांततामय व शिस्तमय वातावरण निर्माण होण्यास मदत होते. वसतिगृहाच्या प्रस्तावित इमारतीत अत्याधुनिक दर्जाच्या सुविधा देण्यात आलेल्या आहे. निश्चितच या वसतिगृहाच्या माध्यमातून संस्थेशी संबंधित सर्व घटकांचे हित जोपासले जाईल. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी निश्चितच मदत होईल.

वसतिगृहाच्या इमारतीची वैशिष्ट्ये

- एकवीस हजार स्क्वेअर फूट जागा

- एक लाख पंधरा हजार स्क्वेअर फुटाचे बांधकाम

- १३ मजले, ६०० विद्यार्थी क्षमता

- स्वतंत्र बाल्कनी, सर्व विद्यार्थ्यांसाठी स्टडी टेबल, वॉर्डरोब

Adv. Nitin Thackeray
Udoji Maratha Boarding Time.
This will be the new building of the hostel.
Nashik MVP 11th Admission : मविप्रच्या ग्रामीण महाविद्यालयांची या तारखेला अकरावीची पहिली यादी

- प्रत्येक मजल्यावर टीव्ही लॉन्च, जिम, इनडोअर प्ले

- दोनशे विद्यार्थी क्षमता असलेला डायनिंग हॉल

- कॅन्टीन, अल्ट्रा मॉडेल किचन

- दोन जिने, तीन लिफ्ट, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प

- चोवीस तास मेडिकल सेवा उपलब्ध

- रेक्टर, फायर फायटिंग, सिक्युरिटी जवळपास ७० सीसीटीव्ही कॅमेरे

- पाच लाख लिटर वॉटर स्टोरेज व सत्तर हजार लिटर ओव्हरहेड वॉटर टॅंक

- सोलर वॉटर हीटर सिस्टिम टू व फोर व्हीलरसाठी पार्किंग.

Adv. Nitin Thackeray
Udoji Maratha Boarding Time.
This will be the new building of the hostel.
Nashik News: वीजनिर्मितीत MVP होणार स्‍वयंपूर्ण; Solar Park किंवा शाखानिहाय सौरऊर्जा प्रकल्‍पाची चाचपणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.