नाशिक : पुरुषांच्या वेटलिफ्टिंगमध्ये नाशिक परिक्षेत्राचा पारस देशमुख याने ८९ किलो वजनीगटात तर, महिलांमध्ये कोल्हापूर परिक्षेत्राच्या माधवी साळुंके यांनी ७६ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
तर, १० हजार मीटर धावण्यात प्रशिक्षण संचालनालयाच्या लक्ष्मण दरवडा याने प्रथम क्रमांक पटकावला. सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये पुणे शहर, ठाणे शहर, अमरावती परिक्षेत्र, कोल्हापूर परिक्षेत्राच्या संघांनी आगेकूच केली आहे. (State Police Sports Competition Paras Deshmukh Madhavi Salunkhe won gold in weightlifting Progress of Pune Thane Amravati zone teams nashik)
त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावर राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिला व पुरुषांच्या खो-खो, कबड्डी, हॅण्डबॉल, फुटबॉल यांचे सांघिक सामने झाले. तर, पुरुष गटामध्ये १० हजार मीटर धावण्याची, लांब उडी, हतोडा फेक या स्पर्धा पार पडल्या आहेत.
पुरुषांच्या १० हजार मीटर धावण्यात प्रशिक्षण संचालनालयाचा लक्ष्मण दरवडा याने प्रथम तर, एसआरपीएफच्या बालाजी कांबळे याने द्वितीय, एसआरपीएफच्याच अमोल रंगे याने तृतीय क्रमांक पटकावला.
लांब उडीमध्ये नागपूर परिक्षेत्राच्या अमित म्हस्के याने प्रथम, प्रशिक्षण संचालनालयाचा संजय लोहार याने द्वितीय, कोल्हापूरच्या सचिन कोळी याने तृतीय क्रमांक मिळविला.
हतोडा फेक प्रकारात नाशिक परिक्षेत्राचा हेमंत बारी याने प्रथम, प्रशिक्षण संचालनालयाचे अक्षय मोरे याने द्वितीय, कोल्हापूरच्या संतोष जाधव याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
- हॅण्डबॉल (पुरूष) : विजयी संघ : पुणे व पिंपरी चिंचवड, एसआरपीएफ परिक्षेत्र, नागपूर परिक्षेत्र, ठाणे शहर, नागपूर शहर
- खो-खो (पुरूष) : विजयी संघ : अमरावती परिक्षेत्र, पुणे व पिंपरी चिंचवड, एसआरपीएफ परिक्षेत्र, नागपूर शहर, नवी मुंबई व मिरा-भाईंदर
- खो-खो (महिला) : विजयी संघ : ठाणे शहर, पुणे व पिंपरी चिंचवड, नागपूर परिक्षेत्र, अमरावती परिक्षेत्र
- फुटबॉल (पुरूष) : विजयी संघ : प्रशिक्षण संचालनालय, ठाणे शहर, नागपूर शहर
- खो-खो (पुरुष) : विजयी संघ : पुणे व पिंपरी चिंचवड, कोल्हापूर परिक्षेत्र
- वेटलिफ्टिंग (पुरूष)
७३ किलो : प्रथम - यशवंत पडवळे (पुणे शहर व पिंपरी चिंचवड), द्वितीय - सचिन पवार (मुंबई), तृतीय - अभिजित सोनटक्के (प्रशिक्षण संचालनालय)
८१ किलो : प्रथम - साहिल बागवान (मुंबई), द्वितीय - मिलिंद अत्राम (नागपूर परिक्षेत्र), तृतीय - राहुल झागडे (प्रशिक्षण संचालनालय)
८९ किलो : प्रथम - नंदकिशोर कापळे (प्रशिक्षण संचालनालय), द्वितीय - विकास महाजन (ठाणे शहर), तृतीय - राहुल दोरकर (कोल्हापूर परिक्षेत्र)
९६ किलो : प्रथम - पारस देशमुख (नाशिक परिक्षेत्र), द्वितीय - संतोष जाधव (कोल्हापूर परिक्षेत्र), तृतीय - इंद्रजीत मोहिते (मुंबई)
- वेटलिफ्टिंग (महिला)
५९ किलो : प्रथम - योगिता बाबर (लोहमार्ग परिक्षेत्र), द्वितीय - शोभा इंगळे (मुंबई), तृतीय - पूजा यादव (प्रशिक्षण संचालनालय)
६४ किलो : प्रथम - सोनाल बच्चे (मुंबई), द्वितीय - विनया माने (लोहमार्ग परिक्षेत्र), तृतीय - अर्चना राबाने (प्रशिक्षण संचालनालय)
७१ किलो : प्रथम - मनिषा शिंदे (ठाणे शहर), द्वितीय - युंगधरा औसरमल (पुणे व पिंपरी चिंचवड), तृतीय - वर्षा कदम (नाशिक परिक्षेत्र)
७६ किलो : प्रथम - माधवी साळुंखे (कोल्हापूर परिक्षेत्र), द्वितीय - निलुफर शेख (अमरावती परिक्षेत्र), तृतीय - सोनाली काटे (नाशिक परिक्षेत्र)
१० हजार मीटर (पुरुष)
- प्रथम - लक्ष्मण दरवडा ( प्रशिक्षण संचालनालय), द्वितीय - बालाजी कांबळे (एसआरपीएफ), तृतीय - अमोल रंगे (एसआरपीएप), चतुर्थ - दिलीप कल्लाढोळे (प्रशिक्षण संचालनालय), पाचवा - मोतीराव वसावे (कोल्हापूर)
लांबउडी (पुरुष)
- प्रथम - अमित मसरके ( नागपूर परिक्षेत्र), द्वितीय - संजय लोहार (प्रशिक्षण संचालनालय), तृतीय - सचिन कोळी (कोल्हापूर), चतुर्थ - वैभव लुटे (प्रशिक्षण संचालनालय), पाचवा - प्रसाद भक्तू (एसआरपीएफ)
हातोडा फेक (पुरुष)
- प्रथम- हेमंत बारी (नाशिक परिक्षेत्र), द्वितीय - अक्षय मोरे (प्रशिक्षण संचालनालय), तृतीय - संतोष जाधव (कोल्हापूर), चतुर्थ - भूषण चित्ते (नाशिक परिक्षेत्र), पाचवा - प्रणय तायडे (मुंबई शहर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.