Nashik Bribe Crime : लाचखोर विक्रीकर अधिकारी जेरबंद; 40 हजारांची लाच घेताना अटक

state tax official was arrested red handed taking bribe nashik crime news
state tax official was arrested red handed taking bribe nashik crime newsesakal
Updated on

Nashik Bribe Crime : जाहिरात चित्रीकरणासाठी आलेले वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात ४० हजारांची लाच स्वीकारलेल्या राज्य कर अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता ४) ही कारवाई केली.

जगदीश सुधाकर पाटील (वय ३९, रा. ९०२, एफ विंग, अनमोल नयनतारा सिटी दोन, फेज-२, कर्मयोगी नगर, नाशिक) असे अधिकाऱ्याचे नाव आहे. (state tax official was arrested red handed taking bribe nashik crime news)

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्याचा जाहिरात चित्रीकरणाचा व्यवसाय आहे. जाहिरात चित्रीकरणाचे कामात व्यत्यय येऊन तक्रारदार यांचे पाच ते सहा लाखाचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून चित्रीकरणासाठी आलेले वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात लाचखोर पाटील यांनी ४० हजारांच्या लाचेची मागणी केली.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी केल्यानंतर सायंकाळी पाथर्डी फाटा परिसरातील विक्रीकर कार्यालयात सापळा रचला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

state tax official was arrested red handed taking bribe nashik crime news
Nashik Bribe Crime : अभोण्याच्या सहायक निरीक्षकासह शिपाई ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; स्वीकारली 10 हजारांची लाच

पाटील याने लाचेची रक्कम स्वीकारतात पथकाने त्यास अटक केली. या प्रकरणी इंदिरा नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, प्रकाश महाजन यांनी कारवाई केली.

state tax official was arrested red handed taking bribe nashik crime news
Sunita Dhangar Bribe Case: सुनीता धनगरविरोधात अपसंपदेचा गुन्हा; ज्ञात स्रोतापेक्षा 64.87 टक्के जादा संपत्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.