पुणे, धुळ्यासह अन्‍य मार्गांवर उद्यापासून धावणार लालपरी

st
stesakal
Updated on
Summary

जिल्‍हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्‍यानंतर महाराष्ट्र राज्‍य मार्ग परीवहन महामंडळातर्फे सुधारित वेळापत्रक तयार केले आहे. त्‍यानुसार उद्या (ता.७) पहाटेपासून पुणे, धुळ्याकरीता बसगाड्या उपलब्‍ध असतील.

नाशिक : जिल्‍हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्‍यानंतर महाराष्ट्र राज्‍य मार्ग परीवहन महामंडळातर्फे सुधारित वेळापत्रक तयार केले आहे. त्‍यानुसार उद्या (ता. ७) पहाटेपासून पुणे, धुळ्याकरीता बसगाड्या उपलब्‍ध असतील. याशिवाय औरंगाबाद, चोपडा, मुंबई व अन्य मार्गांवरही लालपरी धावणार आहे. जिल्‍ह्यांतर्गत बससेवादेखील प्रवाश्‍यांच्‍या संख्येनुसार उपलब्‍ध केली जाणार आहे. प्रवासाकरीता आरक्षण सुविधादेखील उपलब्‍ध असेल. (state transport bus service will start from 7 june on pune dhule and other routes)


महामंडळाच्‍या नाशिक विभागातर्फे जारी वेळापत्रकानुसार नाशिकहून साधारणतः धुळ्याकरीता पहाटे पाचपासून दर अर्ध्या तासाने बसगाडी उपलब्‍ध असेल. पुण्याकरीतादेखील पहाटे पाच वाजून २० मिनीटांपासून बस सोडली जाणार आहे. याशिवाय मुंबई, बोरिवली, औरंगाबाद, जळगाव आदी मार्गांवर बस सुटेल. मार्गावर सकाळी सहा पासून दर तासाने बस सुटेल. नाशिकहून औरंगाबाद तसेच नंदुरबारकरिता दर एक तासाला बस सुटेल. जिल्‍ह्यातर्गत बससेवादेखील प्रवाश्‍यांसाठी उपलब्‍ध असणार आहे. दरम्‍यान शासनाच्‍या निर्देशांनुसार निर्जुंतुकीकरणास प्राधान्‍य दिले जाते आहे. प्रवाशांना बसने प्रवास करतांना मास्‍कचा वापर बंधनकारक असणार आहे. बसमध्ये पूर्ण आसन क्षमतेने प्रवाशी वाहतूक सुरु करण्याचे नियोजन केले आहे. उभे राहून प्रवाश्‍यांना प्रवास करता येणार नाही.

st
जिल्ह्यात मानव-बिबट्या संघर्षाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर



नाशिकहून सुटणाऱ्या बसगाड्यांच्‍या वेळा -

  • पुणे - पहाटे ५ वाजून २० मिनीटे, सहा वाजता, सात वाजून वीस मिनीटे, आठ वाजता, ९ वाजून वीस मिनीटे, दहा वाजता, १०.४०, १२ वाजता, १२.४०, दुपारी दोन, तीन वाजून २० मिनीटे, चार वाजता, पाच वाजून २० मिनीटे, सायंकाळी सहा वाजता, सात वाजून २० मिनीटे, रात्री नऊ वाजून वीस मिनीटे, दहा वाजता.

  • बोरीवली - सकाळी सहा, सात, आठ, साडे नऊ, साडे दहा, दुपारी साडे बारा, दीड, साडे तीन, साडे पाच वाजता.

  • मुंबई - सकाळी सव्वा सहा, नऊ आणि अकरा वाजता.

  • दादर– दुपारी तीन व सायंकाळी पाच वाजता.

  • औरंगाबाद - सकाळी साडे आठ, दुपारी एक, साडे तीन, पावणे पाच वाजता.

  • जळगाव - दुपारी अडीच व साडे तीन वाजता.

(state transport bus service will start from 7 june on pune dhule and other routes)

st
कोरोनामुळे अनाथ बालकांचा प्रश्न ऐरणीवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.