Nashik News : मेळा बसस्थानकावरून पुणे, कोल्हापूरसह धुळे, जळगावसाठी बस

त्र्यंबकेश्‍वरसह अहमदाबाद, सुरतच्‍या बस सुटणार नवीन सीबीएसवरून
mela bus stand
mela bus standesakal
Updated on

Nashik News : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) बसस्थानकावरून सोडण्यात येणाऱ्या बसगाड्यांचे पुनर्नियोजन केले आहे. त्‍यानुसार नुकतेच उद्‍घाटन झालेल्‍या वातानुकूलित मेळा बसस्थानकावरून पुणे, कोल्‍हापूर, छत्रपती संभाजीनगरसह धुळे, जळगावला जाण्यासाठी बसगाड्या सोडल्‍या जातील.

नवीन सीबीएस बसस्थानकावरून परराज्‍यातील अहमदाबाद, सुरतसह अन्‍य मार्गांवर बस सुटणार आहेत. (State Transport Corporation has rescheduled buses leaving from bus stand nashik news)

नवीन सीबीएस, महामार्गावरून कसारासह इतर ठिकाणांसाठी बस सुटतील. वातानुकूलित बसगाड्यांतील आगाऊ आरक्षण असलेल्‍या प्रवाशांना वातानुकूलित प्रतीक्षालय सुविधा मेळा बसस्‍थानकावर उपलब्‍ध असेल. महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी सुधारित नियोजन जाहीर केले आहे. यापूर्वी शहरातून जुने सीबीएस, नवीन सीबीएस आणि महामार्ग बसस्थानकावरून बसगाड्या सोडण्यात येत होत्‍या.

मेळा बसस्‍थानकाचे काम सुरू असल्‍याने काही वर्षांपासून हा परिसर बंदावस्‍थेत होता. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते उद्‍घाटन झाल्यानंतर मेळा बसस्‍थानक प्रवाशांच्या सेवेसाठी खुला झाला आहे. वातानुकूलित स्वरूपाच्या या बसस्थानकावरून लांब पल्ल्‍याच्‍या गाड्या सोडण्याचे नियोजनही आखले आहे.

mela bus stand
Nashik News : माळेगाव होणार सर्वांत मोठी ‘MIDC’; एकरी 52 लाखांचा दर जाहीर

मेळा बसस्थानकावरून या शहर/गावांसाठी सुटतील बस

* पुण्यासाठी वातानुकूलित फलाटावरून विनावाहक शिवशाही, शिवाई, जनशिवनेरी

* स्‍वारगेट, कोल्‍हापूर, महाबळेश्‍वर, हुबळी, बेळगावसाठी वातानुकूलित फलाटावरून बस सुटतील

* पुणे साध्या बससह तळेगाव, सासवड, फलटण, नारायणपूर, कोरेगाव, सातारा, मिरज, सांगली आदी

* मालेगावसाठी विनावाहक तसेच साधी बस. धुळ्यासाठी विनावाहक बस

* चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर, धुळे, शिंदखेडा, दोंडाईचा, शहादा, शिरपूर, इंदूर

* जळगाव, शेगाव, नागपूर, अकोला, अमरावती

* भुसावळ, मुक्‍ताईनगर, मलकापूर, बुलडाणा, चिखली, खामगाव, अमळनेर, चोपडा, यावल, रावल आदी

* छत्रपती संभाजीनगरसाठी शिवशाही व साधी हिरकणी. येवला, लासलगाव, बुलडाणा

mela bus stand
Nashik News: चिचोंडी येथे 67 पिशव्यांचे रक्त संकलन; विधायक उपक्रमातून मेजर नारायण मढवई यांना आदरांजली

नवीन सीबीएसवरून या शहर/गावांसाठी बस सुटतील

* त्र्यंबकेश्‍वर, तोरंगण, पिंपळगाव, इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे, सिन्नर, करंजी

* कसारा, वसई, मनमाड, नांदगाव, बोलठाण, पालघर, सफाळे, बोईसर, डहाणू, जव्‍हार

* वापी, सुरत, अहमदाबाद

जुने सीबीएसवरून या शहर/गावांसाठी बस सुटतील

* सप्‍तशृंगगड, कळवण, शिवभांडणे, खिराड, मांगीतुंगी

* सुरगाणा, पळसन, बर्डीपाडा, उंबरठाण, खोंबळा, करंजूल, लासलगाव

* हरसूल, ठाणापाडा, पेठ, कसोली, इंदोले आदी

* सटाणा, दोंडाईचा, साक्री, नवापूर, दहिवेल

mela bus stand
Nashik News: चिचोंडी येथे 67 पिशव्यांचे रक्त संकलन; विधायक उपक्रमातून मेजर नारायण मढवई यांना आदरांजली

महामार्ग बसस्थानकावरून या शहर/गावासाठी सुटेल बस

* मुंबई, बोरिवली, दादर, ठाणे, कसारा, नालासोपारा, वसई, अर्नाळा

* कल्‍याण, डोंबिवली, वाशी, उरण, विठ्ठलवाडी

* पनवेल, अलिबाग, मुरुड, रोहा, महाड, दापोली

* कोपरगाव, शिर्डी, शनिशिंगणापूर, संगमनेर, नगर

* पंढरपूर, तुळजापूर, लातूर, विजापूर, बारामती, बीड, श्रीरामपूर, शेवगाव, पैठण आदी

* छत्रपती संभाजीनगर, सिल्‍लोड, अंबड, यवतमाळ, परभणी, जालना

* सटाणा, साक्री, नंदुरबार, अक्‍कलकुवा, खापर, अमरावती

* मालेगाव, धुळे, चोपडा, अमळनेर, चिखली, बुलडाणा आदी

mela bus stand
Nashik News : कंत्राटी वैद्यकीय अधिकारी 4 महिन्यांपासून वेतन थकीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.