नाशिक : जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनकडून शनिवार (ता.२७) व रविवारी (ता.२८) महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स परिषद २०२३-२४ आयोजन केले आहे.
भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे होणाऱ्या परिषदेचे शनिवारी सकाळी १० वाजता केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत. (State Urban Cooperative Banks Parishad inaugurated by Amit Shah on Saturday Nashik News)
डिजिटलायझेशन, माहिती व आधुनिक तंत्रज्ञानाचा वेगवान वापर व भविष्यातील आव्हाने यावर परिषदेत विचारमंथन होणार आहे.
परिषदेला केंद्रीय सहकार विभागाचे न्यू ड्राफ्ट पॉलिसी (को-ऑपरेटिव्ह) चेअरमन सुरेश प्रभू, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री दादा भुसे, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले,
सरोज अहिरे, सत्यजित तांबे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे, परिषदेचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, सहभाग सहकार भारती प्रदेशाध्यक्षा डॉ. शशीताई अहिरे,
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष व प्रशासक विद्याधर अनास्कर, नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिलीप संघानी, नॅफकबचे अध्यक्ष ज्योतींद्र मेहता, सारस्वत को-ऑप. बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, कॉसमॉस को-ऑप. बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
रविवारी (ता.२९) केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप होणार आहे.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, माजी मंत्री जयंत पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थितीत राहणार आहेत.
परिषदेला उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागताध्यक्षा केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण डॉ. भारती पवार, खासदार हेमंत गोडसे, निमंत्रक विश्वास ठाकूर, महेंद्र बोरा, राजेश भांडगे, दत्ता गायकवाड, हेमंत धात्रक, राजेंद्र सूर्यवंशी, नानासाहेब सोनवणे, अशोक झंवर, संजय वडनेरे, हिरालाल सुराणा, अशोक तापडीया, शरद कोशिरे, सुनील गिते, कैलास येवला, राजकुमार संकलेचा, मनोज गोडसे, शरद दुसाने, वसंत खैरनार, नितीन वानखेडे, रत्नाकर कदम, अबिद अहमद अब्दुल रशीद, मिर्झा सलीमबेग जब्बारबेग आदींनी केले आहे.
परिषदेत होणारे परिसंवाद
शनिवारी दुपारी २.३० ते ३.३० वेळात ‘नागरी सहकारी बँकांपुढील आव्हाने’, दुपारी ३.४५ ते ४.४५ या वेळात ‘अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आणि सहकारी बँका’. रविवारी सकाळी ९.३० ते १०.३० वेळात ‘बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट व नागरी सहकारी बँका’, सकाळी १०.४५ ते ११.४५ वेळात ‘केंद्रीय सहकार मंत्रालय; सहकाराची नवी दिशा’, दुपारी १२ ते १ वेळात ‘सहकार चिंतन व शाश्वत मूल्यांची विश्वासार्ह परंपरा’, दुपारी ३.१५ ते ४. १५ या वेळात ‘डिजिटल क्रांतीचे फलित-व्यापार, व्याप्ती, वर्तमान’ या विषयांवर परिसंवाद होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.