नाशिक : सरकारी, निमसरकारी नगरपालीका नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी समितीने जुन्या पेन्शन योजनेसह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १४ मार्चला राज्यव्यापी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
त्याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांना आज कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात आले. (Statement of State Government Employees on Strike nashik news)
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षा, महापालीका नगरपालीका नगरपरिषद, पंचायत कर्मचारी अशा विविध आहेत संघटनांच्या मार्फत शासनाकडे प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सतत प्रयत्न करुनही शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा संघटनांचा आरोप आहे. सरकारी निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी आज जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांना निवेदन दिले.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ, सरचिटणीस सुनंदा जरांडे, ए.के.वाबळे, संजय जाधव, लता परदेशी, तुषार नागरे, दुर्गेश कुलकर्णी, जीवण आहेर, राजेंद्र पाबळे, एम.एन.पिंगळे, जिजा गवळी, भास्कर भामरे,एस.एम.पिंगळे,अरुण तांबे, सागर नागरे, उमाकांत ढाले, प्रशांत खालकर, संभाजी आगलावे आदीच्या नेतृत्वाखाली आज विविध संघटनांच्या प्रतिनिधीनी निवेदन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.