Nashik Sahyadri Farms: राज्यातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प सह्याद्री फार्म्समध्ये कार्यान्वित!

‘सह्याद्री फार्म्स‘ चा काजू मुल्यसाखळी उभारणीवर भर,काजू उत्पादक शेतकर्‍यांना होणार फायदा
Cashew Processing Plant
Cashew Processing Plantesakal
Updated on

Nashik Sahyadri Farms : द्राक्ष व फलोत्पादन निर्यातीत आघाडीवर असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने कोकण व आदिवासी पट्ट्यातील महत्वाचे पिक असलेल्या काजूच्या मुल्यसाखळी उभारणीवरही भर देण्यास सुरवात केली आहे.

कंपनीच्या मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स कॅम्पस मध्ये प्रतिदिन तब्बल 100 टन क्षमतेचा काजू प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे.

काजू निर्मितीबरोबरच काजू कवचापासून तेल निर्मितीही सुरु करण्यात आली आहे.  राज्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्टयातील भागाचे अर्थकारण उंचावण्यास यामुळे मदत होणार आहे. (States Largest Cashew Processing Plant Launched at Sahyadri Farms nashik news)

esakal

या विषयी अधिक माहिती देतांना सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे म्हणाले की, जगात काजू उत्पादनात भारत म्हणून आपण जगात आघाडीवर असलो तरीही देशांतर्गत असलेली काजूची मागणीही आपण पूर्ण करु शकत नाही.

इतकी या शेतीत व व्यापारात वाढीला संधी आहे. महाराष्ट्रात कोकणाबरोबरच सह्याद्रीच्या पर्वतरांगातील घाटमाथ्यावरील इतरही भागात काजूमुळे आर्थिक क्रांती घडवण्याची संधी आहे.

या संधीचे रुपांतर ताकदीच्या मुल्यवर्धित साखळीत करण्याची गरज आहे. त्यासाठी ‘सह्याद्री’ने ही सुरुवात केली आहे. 

काजूची सरासरी उत्पादकता वाढविण्याबरोबरच दुसरीकडे काजू गर व बोंडापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचे मोठे प्रकल्प उभारण्यावर भर देणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

esakal
Cashew Processing Plant
2024 मध्ये महिला भाजपसाठी गेम चेंजर? महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोंदींचा 'मास्टरस्ट्रोक'

यातून केवळ काजू उत्पादक शेतकऱ्यांचेच उत्पन्न वाढणार नाही तर गावातच रोजगाराची संधी निर्माण झाल्यामुळे रोजगारासाठी शहरात गेलेला तरुणवर्ग पुन्हा गावांत स्थिरावणार आहे. इतकी क्षमता यात आहे. त्यासाठी काजू पिकाच्या मुल्यसाखळ्या उभ्या करण्यावर ‘सह्याद्री फार्म्स‘ भर देणार आहे.  

‘सह्याद्री’चा काजू प्रक्रिया प्रकल्प 

 प्रति दिनी 100 टन कच्चे काजू हाताळणीची क्षमता 

देशातील टॉप 10 मधील आणि राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प 

प्रक्रियेची सर्व यंत्रणा एकाच ठिकाणी 

काजू कवचापासून तेल काढणीचा 20 टन क्षमतेचा प्लॅन्ट 

उत्पादन गुणवत्तेच्या बीआरसी उच्च मानकांच्या समकक्ष व्यवस्थापन 

परिसरातील 300 हून अधिक महिलांना कायमस्वरुपी रोजगार 

Cashew Processing Plant
एसटीची विना वातानुकूलित स्लीपर बस लवकरच सेवेत; स्वमालकीच्या ५० बसेस बांधण्याचं काम सुरु, काय आहेत वैशिष्ट्ये?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.