Nashik Crime : सराईत गुन्हेगार व सुनील वाघ खूनप्रकरणी शिक्षा ठोठावलेला व्यंक्या ऊर्फ व्यंकटेश मोरे आठवडाभरापासून जिल्हा शासकीय रुग्णालयात मुक्काम ठोकून आहे.
पोटात दुखत असल्याच्या कारणास्तव जिल्हा रुग्णालयात दाखल असून, चांगलीच त्याची ‘बडदास्त’ ठेवली जात आहे.
त्यामुळे अजून तरी सिव्हिलमधील त्याचा मुक्काम हलतानाचे चिन्हे नसल्याचे दिसते आहे. (stay of Sarait criminal Venkya at civil hospital not changed Nashik Crime)
दोन महिन्यांपूर्वी जुलैमध्ये पंचवटीतील भेळविक्रेता सुनील वाघ खून खटल्याचा निकाल लागला. यामध्ये अलीकडे राजकीय वरदहस्तामुळे ‘पावन’ झालेल्या सराईत गुन्हेगारांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.
यात सराईत गुन्हेगार व्यंकटेश मोरे ऊर्फ व्यंक्याचाही समावेश असून, त्यास सात वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे त्याचा मुक्काम नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात होता.
मात्र गेल्या आठवड्यातील ६ तारखेपासून तो जिल्हा शासकीय रुग्णालयात पोटदुखीच्या तक्रारीमुळे उपचारासाठी दाखल झाला आहे.
आठवडाभरापासून उपचारानंतरही त्याचा जिल्हा रुग्णालयातील मुक्काम कायम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. व्यंकटेश मोरे याचा राजकीय पक्षाशी संबंध असल्यानेच त्याचा जिल्हा रुग्णालयातील मुक्काम कायम असल्याचीही चर्चा आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
चांगलीच बडदास्त
उपचाराच्या नावाखाली दाखल असलेल्या व्यंक्या मोरे यास भेटण्यासाठी पहिल्या दिवसापासून ‘कार्यकर्त्यां’ची गर्दी असते. नेहमीच वॉर्डच्या बाहेर ‘हलचल’ चालू असते.
त्यामुळे व्यंक्या मोरे उपचारासाठी दाखल आहे की भेटीगाठीसाठी, अशी शंका उपस्थित होते आहे. त्यातच, ज्या वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहे, तेथे डासांचा त्रास असल्याची तक्रार करीत त्याने खिडक्यांना जाळ्या बसविण्याचे ‘फर्मान’ ही सोडून झाले. प
रंतु जिल्हा रुग्णालयात शेकडो रुग्ण उपचार घेत असताना त्यांच्या आर्जवांना न नमणाऱ्या रुग्णालय प्रशासनाने व्यंक्याच्याही फर्मानाला केराची टोपली दाखविल्याने त्यावरून त्याने आकांडतांडव केल्याची चर्चा आहे.
एकूण घरचे जेवण आणि भेटीगाठी यामुळे व्यंक्याची मध्यवर्ती कारागृहापेक्षा जिल्हा रुग्णालयातच चांगलीच बडदास्त ठेवली जात असल्यानेच मुक्काम कायम असल्याचे बोलले जाते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.