New Education Policy : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीत क्रीडातज्ज्ञ म्हणून पंचवटीतील र. ज. चव्हाण गर्ल्स हायस्कूलचे प्रद्युम्न जोशी यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. (Steering Committee for Effective Implementation of New National Education Policy Education Minister Chairman nashik)
सर्वांना सहज शिक्षण, समानता, गुणवत्ता, परवडणारे शिक्षण, उत्तरदायित्व या पाच स्तंभावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आधारित आहे. सुकाणू समितीचे सचिव म्हणून शालेय शिक्षणचे अवर सचिव हे काम पाहतील.
याशिवाय या विभागाचे प्रधान सचिव, सहसचिव- उपसचिव, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक हे सदस्य असतील.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शैक्षणिकतज्ज्ञ म्हणून विलेपार्लेचे रमेश देशपांडे, ठाण्याच्या संघानिया हायस्कूलचे प्राचार्य रेवती श्रीनिवासन यांचा, तर बाल मानसशास्त्रज्ञ म्हणून अमरावतीच्या डॉ. विद्युत खंडेवले, ठाण्याच्या डॉ. अरुंधती भालेराव यांचा,
बाल विशेषज्ञ म्हणून टाटा ट्रस्टच्या मालविका झा, ठाण्याच्या महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य संतोष भांगे यांचा आणि योग्यता चाचणीतज्ज्ञ म्हणून मुंबईच्या कॅम्पेन स्कूलचे फादर जॉन रोझ,
सेंट अलेक्झांड्रा गर्ल्स स्कूलच्या यास्मीन ए. कविना यांचा व सांस्कृतिकतज्ज्ञ म्हणून ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्रा. प्रदीप ढवळ यांचा समितीत समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.