Nashik Crime : तीन आठवड्यांपूर्वी गंगापूर रोड परिसरातील बंगल्यासमोरून चोरट्यांनी चोरून नेली इनोव्हा कार गंगापूर पोलिसांनी मध्यप्रदेशातून जप्त केली आहे.
सदरची कार मध्यप्रदेशातील निमच जिल्ह्यातल्या वाहन विक्री बाजारात विक्री ठेवलेली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (Stolen Innova found in Madhya Pradesh Gangapur police arrested three people Nashik Crime)
राजेश राधेश्याम पंडित (३७, रा. धायतुरागाव, ता.जि. आग्रा, उत्तरप्रदेश), मनोज महेंद्र परिहार (४२, रा. नगला अहिरगाव, ता.जि. हाथरस, उत्तरप्रदेश), इस्माईल शब्बीर अहमद खान (३७, रा. शास्त्री पार्क, इस्ट दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
मयुर राजेंद्र शहाणे (रा. रोहिणीराज बंगलो, आकाशवाणी टॉवर्स, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार त्यांची १४ लाख ५० हजार रुपयांची इनोव्हा कार (एमएच १५ एफयु ६४४४) गेल्या १ आॅगस्ट रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास बंगल्यासमोरून चोरट्यांनी कारची काच फोडून चोरून नेली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल होता.
सदरील गुन्ह्याचा तपास गंगापूरचे गुन्हेशोध पथक घेत होते. तांत्रिक माहितीच्या आधारे सदरची कार राजस्थानात चोरट्यांनी नेल्याचे निदर्शनास आले होते. त्यासाठी पथकेही रवाना करण्यात आली. परंतु कार सापडली नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दरम्यान पोलिसांनी राजस्थानसह उत्तरप्रदेश, दिल्ली आणि मध्यप्रदेशातही कारचा शोध घेतला असता, त्यांना खबर्यामार्फत सदरची कार मध्यप्रदेशातील निमच जिल्हयातल्या वाहन विक्री बाजारात विक्रीसाठी असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सदरची कार जप्त करीत संशयितांनाही अटक केली.
सदरची कामगिरी गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत निबांळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सहायक निरीक्षक नितीन पवार, संजय भिसे, उपनिरीक्षक एम.डी. पाटील, महाले, परदेशी, मोहिते, वाघचौरे, साळुंके, खाडे, जाधव, मंडले यांनी बजावली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.