Nashik Crime : कळवण शहराजवळील मानूर शिवारातील श्री पेट्रोल पंपावर रात्री 3 वाजेदरम्यान डिझेल / पेट्रोल देण्यासाठी कर्मचारी उठले नाही, या रागातून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अज्ञात व्यक्तीने पंपाच्या कॅबिनच्या काचेच्या दरवाज्यावर रागाच्या भरात दगड फेकून मारल्यामुळे पेट्रोल पंप कार्यालय कॅबिनच्या दरवाज्याची तोडफोड करण्यात आली आहे.
तीन ते चार अज्ञात व्यक्तीं होते त्यातील एकाने दगड मारल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना पेट्रोल पंपाच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत कळवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Stone pelting for employees not getting up to give diesel case registered against an unknown person Nashik Crime)
मानूर शिवारात कळवण सुरगाणा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार नितीन पवार यांच्या मालकीच्या पेट्रोल पंप आहे. रात्रीच्या वेळी डिझेल/ पेट्रोलसाठी कर्मचाऱ्यांना आवाज देऊन देखील उठले नाही.
डिझेल /पेट्रोल मिळाले नसल्याने एका मद्यधुंद युवकांने दगड मारल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे व पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले व त्यांनी पहाणी केली .
पेट्रोल / डिझले भरण्यासाठी आलेले हे चारही अज्ञात युवक मद्याच्या नशेत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झालेल्या हालचालीवरुन लक्षात येत असल्याचे पोलीस सूत्रांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्यांची ओळख पटली असून ते नियमीत पेट्रोल पंपावर येत असल्याचे पंपावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
असून हे अज्ञात अनोळखी इसम डिझेल / पेट्रोल भरण्यासाठी स्वीफ़्ट डिझायर वाहनातून आले होते. याबाबत पेट्रोल पंपाचे मॅनेजर नामदेव भुरा साबळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात भादवी कलम ४२७ नुसार मालमत्तेच्या नुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेच्या चौकशीसाठी घटनेतील वाहन देवळा कडून नांदुरीकडे जात असल्याचे आढळून आल्याने कळवण पोलिसांनी शरद पवार पब्लिक स्कुल, एचपी पेट्रोल पंप व कळवण शहरातील पोलीस स्टेशन व इतर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज तपासले असून या घटनेचा पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडे तपास करीत आहे.
"या घटनेचा तपास सुरु असून हि घटना राजकीय वैमन्यासातून झाली नाही, केवळ पेट्रोल / डिझेल दिले नाही या रागातून हे कृत्य घडले असल्याचे प्रथमदर्शनी फुटेजवरुन दिसून येते. एक तरुण मद्यधुंद अवस्थेत हातात दगड घेऊन डुलत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यांची ओळख पटली असून पोलीस शोध घेत आहे."- समाधान नागरे, पोलीस निरीक्षक कळवण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.