सिन्नर: दिवसेंदिवस आधुनिक युगाचे तंत्र हे वाढत असून यामध्ये अनेक नवनवीन बदल होत आहे पण मागील पिढींच्या बाबतीत जर विचार करायचा म्हणले तर दगडाची पाटी हीच अभ्यासक्रमाची सुरुवात होती असे म्हणले तर वावगे होणार नाही कारण शाळा म्हणजे पाटी पाठी म्हणजे सुरेख लेखन अशी ही शिक्षणाची पद्धत होती.
पण काळाच्या ओघात पाटी कधी फुटली व नामशेष झाली हे कळले सुद्धा नाही. शाळा म्हटली म्हणजे नवे कपडे, हातात दप्तर, दप्तरात दगडी पाटी, खडू अगर पेन्सिल, पुस्तके असा लवाजमा दरवर्षी शाळेत जाताना असायचा. (Stone Slate banished to technology of modernity Nashik News pvc99)
बाई अथवा गुरुजी हाताला धरून पे- न्सिल पाटीवरून गिरवायच्या; परंतु सध्या या आधुनिक युगामध्ये सारेकाही बदलत चालले आहे. काळानुसार आता शाळेतील दगडी पाटी गायब झाली आहे. त्याची जागा आता वह्या-पुस्तकांनी, इलेक्ट्रॉनिक साधनांनी घेतली आहे. पूर्वी पहिली ते चौथीपर्यंत पाटीचाच वावर व्हायचा; परंतु आता पहिलीपासूनच मुलांना वही आल्याने पाटी नजरेआड झाली आहे.
बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमांत व त्यांच्या साहित्यामध्येही खूप बदल होत गेले आहेत. आता डिजिटल सध्या पाटीची जागा वह्या-पुस्तकांनी घेतली आहे. हल्ली मुलांच्या हाती पाटीऐवजी वह्या, मोबाईल टॅब, संगणक दिसतात; तर पेन्सिलऐवजी पेन. बालवाडीतील मुलांना पाटीचा आधार घेऊन रेषा, विविध आकार, चित्रे रंगवण्यासाठी दिली जाते. त्यानंतर पहिलीपासून ही पाटी अडगळीत पडून कायमचीच लुप्त होते. एरवी अगदी पाचवी-सहावीपर्यंत वापरली जाणारी पाटी आता पूर्णतः गायब झाली आहे.
या दगडी पाट्यांना लाकडाची फ्रेम असायची. नंतर या दगडी पाट्या प्लास्टिकच्या झाल्या आणि फ्रेमही प्लास्टिकची. या प्लास्टिकच्या पाट्यांना मण्यांची तार असायची. त्यातून विद्यार्थ्यांना गणिते करणे सोपे पडत होते. पत्र्याची पाटी ३० ते ४० रुपये दराने मिळत होती. प्लास्टिकची पाटी ६५ ते ७० रुपये दराने विकली जात होती; मात्र आता कोणतीच पाटी बाजारात दिसेनासी झाली आहे.
"॥ श्रीगणेशा ॥ शाळेचा श्रीगणेशा हा दगडी पाटीवरच व्हायचा. पांढरी शुभ्र झालेली ही पाटी घरात यायची. त्यानंतर ती स्वच्छ धुणे हा घरच्या महिलेचा नित्यक्रमच असायचा. मुलांनी पेन्सिल नाहीतर खडूच्या साह्याने काढलेल्या रेघोट्याही कुतूहलाच्या ठरायच्या; मात्र जुने दिवस गेले आणि शिक्षणातही आधुनिकता आली."
कृष्णाजी भगत , मविप्र संचालक सिन्नर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.