Nashik : लग्नातील या प्रथा बंद कराच!

wedding
weddingesakal
Updated on

सायगाव (जि. नाशिक) : येवला परिसरात शेवटच्या टप्यात विवाह सोहळे (Wedding Ceremony) सुरू आहेत. मात्र आजही अनेक अनाठायी प्रथा (practice) रूढ झाल्याने अनेक धार्मिक विधीचे (religious rites) पावित्र्य (Purity) नष्ट होत आहे. तसेच वेळही वाया जात आहे. वधू-वराकडील मंडळींबरोबरच गुरूजींनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (Stop unwanted practice in marriage Nashik News)

wedding
Nashik : बनावट फेसबुक वरून पैशांची मागणी; सायबर सेलकडे करावी तक्रार

प्रत्येक धर्मात विवाह त्या-त्या धर्माच्या रितीरिवाजानुसार केले जातात. हिंदू धर्मातही अनेक विधी आहेत. त्यात मंगलाष्टके हा मुख्य विधी असतो. या विधीला उपस्थित राहण्याचे सर्व आमंत्रित प्रयत्न करतात. मुळातच मुहूर्तावर लग्न लागल पाहिजे. अनेक जण वेळ, पैसा खर्च करून आलेले असतात. कोणत्याही क्षेत्रातील मंडळींचा सत्कार, आर्शिर्वाद कार्यक्रम करायचा असेल, तर तो मंगलाष्टकांच्या आधीच करावा. अनेकदा लग्नविधीसाठी वधू-वरांना उभे केले जाते. ते ताटकळत असतात. मात्र इकडे सत्कार, आर्शिर्वादाचा कार्यक्रम सुरू असतो. गुरुजींनीच मंगलाष्टकांची सुरुवात व शेवट करावा. इतर कोणीही मंगलाष्टके म्हणू नये. आमंत्रित पाहुण्यांचे स्वागत करतांना उपयोगी पडेल असेच फेटे, टोपी, उपरणे आणावे. अनेक जण तर तेथेच ते सोडून जातात. यामुळे हा खर्च वाया जातो. एकूणच या प्रथा बंद होण्यासाठी समाजानेच पुढाकार घेतला पाहिजे.

wedding
Nashik : इंधनावरील कर कपातीची घोषणा हवेतच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.