नाशिक : आदिवासी विकास विभागातर्फे जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना अचानक काही विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्याने गोंधळ उडाला. संशोधन प्रकल्प अर्थात पीएच. डी. करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (टीआरटीआय) फेलोशिप मिळावी, यासाठी मराठवाडा व नांदेड विद्यापीठातील सहा आदिवासी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी केली.
त्यातील आकाश ढोले यास मुख्यमंत्र्यांनी थेट व्यासपीठावर बोलावून घेत चर्चा केली. याप्रकरणी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (stopping speech Chief Minister called tribal phd students on stage for TRTI fellowship Nashik Latest Marathi News)
आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड येथील आकाश ढोले, गजानन डुकरे, दादा गोसावी (मराठवाडा विद्यापीठ), बालाजी देवरे, रामदास वाघनकर, साईसिंग पाडवी (नांदेड विद्यापीठ) या आदिवासी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन घोषणा देण्यास सुरवात केली. ‘फक्त घोषणाच नको, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करा’, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी भाषण थांबून त्यांना व्यासपीठावर घेऊन या, असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिस दोघांना व्यासपीठावर घेऊन गेले. त्यांचे म्हणणे मुख्यमंत्री शिंदे यांनी ऐकून घेतले. राज्यातील बार्टी, महाज्योती व सारथी या संस्थांप्रमाणे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत पीएच. डी. साठी ३५ ते ४० हजार रुपये फेलोशिप मिळावी, अशी मागणी केली. गेल्या दोन वर्षांपासून मागणी आहे.
कधी आदिवासीमंत्र्यांकडे तर कधी आदिवासी आयुक्तांकडे पाठवले जाते. प्रत्यक्षात हाती काहीच पडत नसल्याने आम्ही हे आंदोलन केल्याचे आकाश ढोले यांनी सांगितले. याबाबत लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी या विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ घातला म्हणून मुंबई नाका पोलिसांनी या सहा व्यक्तींना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडून दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.