Unseasonal Rain : नामपूरला गारपिटीसह वादळी अवकाळी पाऊस

In Nampur city around 3.30 pm on Saturday, due to unseasonal rain with hailstorm, water overflowed in the street.
In Nampur city around 3.30 pm on Saturday, due to unseasonal rain with hailstorm, water overflowed in the street.esakal
Updated on

Unseasonal Rain : शहर व परिसरात शनीवारी (ता. ८) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गारपिटीसह झालेल्या वादळी बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांची दैना केली. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करून टाकली.

शहरासह मोसम खोऱ्यात उन्हाळ कांद्याच्या काढणीचे काम जोमाने सुरू आहे. काढणीनंतर शेतातील उन्हाळी कांदा उघड्यावर सापडल्याने कांदा उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तर गहू, हरभरा, हिरवी मिरची, टोमेटो, वेलवर्गीय भाजीपाला आदी पिके बेमोसमी पावसाने बाधित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान कृषी व महसूल विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल सादर करावा, असे आदेश बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती यतींद्र पाटील यांनी दिले आहेत. (Stormy unseasonal rain with hail in Nampur nashik news)

गेल्या आठवडयापासून मोसम खोऱ्यात सर्वत्र प्रचंड उष्मा जाणवत होता. अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांपुढे भिजलेला उन्हाळी कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती. वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. वादळी पावसाचा जोर इतका होता की, अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याने संसार उघडयावर पडला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

In Nampur city around 3.30 pm on Saturday, due to unseasonal rain with hailstorm, water overflowed in the street.
Jalgaon Unseasonal Rain : जळगावात कोसळल्या पावसाच्या सरी; वातावरणात उकाडा

मोसम परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा काढून चाळीत साठवण्यापूर्वी शेतातच ढीग मारून ठेवला होता. वादळ व पावसाचा जोर जास्त असल्याने पावसात हा कांदा भिजला. पावसाने ओला झालेला कांदा आता विक्री व साठवण्या योग्य योग्य राहिलेला नाही.

मोसम खोऱ्यात मोठ्या प्रमाणात झाडाला लागलेल्या कच्या कैरया गळून पडल्याने आम्ब्याचे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज, काकडी या पिकांवरही आजच्या अवकाळी पावसाचा विपरीत परिणाम होणार आहे. मोसम खोऱ्यासह करंजाडी खोऱ्यात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला.

In Nampur city around 3.30 pm on Saturday, due to unseasonal rain with hailstorm, water overflowed in the street.
Dhule Unseasonal Rain : पिंपळनेरसह परिसरात अवकाळी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.