Street Vendors Digital Training : शहरातील 470 पथविक्रेते झाले डिजिटल!

Street Vendors
Street Vendorsesakal
Updated on

नाशिक : पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध होण्यासाठी प्रधानमंत्री आत्मनिर्भर पथविक्रेता निधी योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत आर्थिक व्यवहार करताना डिजिटल साधनांचा वापर करून पथविक्रेत्यांना कर्जाच्या रकमे व्यतिरिक्त कॅश बॅक प्राप्त करण्यासाठी डिजिटल प्रशिक्षण देण्यात आले.

या माध्यमातून ४७० पथविक्रेते डिजिटल झाले आहेत. (Street Vendors Digital Training 470 street vendors in city become digital nashik news)

महापालिका कार्यक्षेत्रात प्रधानमंत्री आत्मनिर्भर पथविक्रेता निधी योजना योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेचा महत्त्वाचा भाग म्हणजे पथविक्रेत्यांचे औपचारिक अर्थव्यवस्थेत समावेश केले जाणार आहे.

पथविक्रेत्यांनी आर्थिक व्यवहार करताना डिजिटल साधनांचा वापर केल्यावर लाभार्थी पथविक्रेत्यांना कर्जाच्या रकमे व्यतिरिक्त कॅश बॅक प्राप्त होणार आहे. यासाठी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ मिळालेल्या पथविक्रेत्यांनी डिजिटल पेमेंट साधनांचा वापर करावा याबाबत शासनामार्फत निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Street Vendors
Nashik News : औद्योगिक वसाहतीतील गावांतर्गतचे प्रश्न सोडवू : ZP CEO आशिमा मित्तल

त्याअनुषंगाने, नाशिकमध्ये ७ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत ‘मैं भी डिजिटल ४.०’ मोहीम राबविण्यात आली. मोहिमेंतंर्गत पीएम स्वनिधी अंतर्गत कर्जाचा लाभ घेतलेल्या परंतु अद्याप डिजिटल पेमेंट साधनांचा वापर न केलेल्या पथविक्रेत्यांना डिजिटल ऑन-बोर्डिंगचे प्रशिक्षण फोन पे, तसेच विविध बँका यांच्यामार्फत देण्यात आले.

मोहिमेंतंर्गत आतापर्यंत ४७० पथविक्रेत्यांना डिजिटल ऑन- बोर्डिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. पथविक्रेत्यांचा वाढता प्रतिसाद बघता सदर मोहीम २८ फेबुवारीपर्यंत वाढविण्यात आली. डिजिटल ऑन-बोर्डिंग प्रशिक्षण घेऊन डिजिटल ऑन - बोर्डिंगद्वारे मिळणाऱ्या कॅश बॅकचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त करुणा डहाळे यांनी केले आहे.

Street Vendors
Nashik News : उपसरपंच पतीकडून आदिवासी सरपंचांच्या अधिकारावर गदा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.