Citylinc Strike : सिटीलिंक चालक, वाहकाचे कामबंद आंदोलन; देयके अदा केल्यानंतर बससेवा पुर्ववत

Citylinc Strike
Citylinc Strikeesakal
Updated on

Citylinc Strike : थकलेल्या वेतनासह अन्य मागण्यांसाठी सिटीलिंक बससेवा कंपनीच्या वाहकांनी गुरुवारी (ता. १३) सकाळी अचानक आंदोलन पुकारल्याने तपोवन बस स्थानकातून दुपारपर्यंत एकही बस बाहेर पडली नाही.

परिणामी प्रवाशांची तारांबळ उडाली. ग्राहकांची नाहक त्रास सहन करावा लागला. यातच बहुतांश विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने ऐनवेळेस या विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागली. (Strike by Citylinc drivers carriers Advance bus service after payment nashik news)

दरम्यान, सिटीलिंक कंपनीने तातडीने थकीत वेतन अदा केल्यानंतर दुपारनंतर सेवा सुरळीत झाली. देयके देण्यास झालेला विलंब, शासकीय सुटीमुळे देयके देण्यास विलंब झाल्याचा दावा करण्यात आला.

महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीच्या माध्यमातून २०२१ पासून बससेवा सुरू आहे. जवळपास अडीचशे बस रस्त्यावर धावतात. ग्रॉस कॉस्ट कटिंग तत्त्वावर सुरू असलेल्या सेवेचे बस ऑपरेटरसह चालक व वाहकदेखील आउटसोर्सिंगने नियुक्त केले आहे.

किलोमीटरनुसार देयके अदा केली जातात. सिटीलिंक बसवर प्रत्येकी पाचशे चालक व वाहक दोन शिफ्टमध्ये काम करतात. वेतनास विलंब झाल्याने वाहकांनी गुरुवारी आंदोलन केले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Citylinc Strike
Nashik Citylink Bus Staff Strike: सिटीलींक बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू, प्रवाशांचे हाल

तपोवन बस डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. सकाळच्या सत्रात शहरात एकही फेरी न झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, दुपारनंतर तातडीने देयके अदा करण्यात आल्यानंतर सिटीलिंक बससेवा पुर्ववत झाली.

"ऑपरेटर्स कडून देयके विलंबाने आली. त्यामुळे मासिक देयके काढण्यास विलंब झाला आहे. परंतु तातडीने देयके दिली गेली. वाहक-चालकांच्या काही मागण्या अजून आहे. त्या पूर्ण केल्या जातील." - शिवाजी चव्हाणके, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिटीलिंक

Citylinc Strike
Birsa Munda Kranti Yojana : आदिवासी शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान! लाभ घेण्याचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.