Nashik Rain Crisis: तुषार सिंचनाद्वारे पिके वाचविण्याची धडपड! पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातूर

Due to heavy rains, farmers have to irrigate crops through frost irrigation.
Due to heavy rains, farmers have to irrigate crops through frost irrigation.esakal
Updated on

Nashik Rain Crisis : पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही तुरळक अपवाद वगळता आतापर्यंतची सर्वच नक्षत्रं कोरडी गेली. त्यात पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे.

त्यामुळे निफाड तालुक्यातील पूर्व भागात तुषार सिंचनाद्वारे पाणी देऊन पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

खरिपातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन, मका पावसाअभावी माना टाकू लागल्याने शेतकरी चिंतातूर आहे. (Struggle to save crops through frost irrigation Farmers worried due to heavy rains nashik)

वरुणराजा यंदा निफाड तालुक्यातील बहुतांश भागावर रुसला आहे. जेमतेम पावसावर केलेली पेरणी वाया जाण्याची स्थिती आहे. एकीकडे दुष्काळ व दुसरीकडे पिकांवर केलेला खर्च यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.

पूर्व भागातील जलसाठ्यांनी तळ गाठला आहे. विहिरी, ओढे-नाले, कूपनलिकांना पाझर फुटलेला नाही. अधूनमधून येणाऱ्या पावसावर पेरणी केली. परंतु, दमदार पाऊस होत नसल्याने डोलणारी पिके जगवताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पाण्याअभावी पिके पिवळी पडत आहे. ऑगस्टचा शेवटचा आठवडा शिल्लक आहे. मात्र, कधी आभाळ भरून येते, तर कधी ऊन पडते. परंतु पाऊस बरसत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

निफाड तालुक्यात सरासरी ४५० मिलिमीटर पावसाची नोंद होते. अडीच महिन्यांनंतरही जोरदार पाऊस झालेला नाही. अवघा १७८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

त्यामुळे ३५ हजार हेक्टरवर पेरणी झालेल्या पिकांना तुषार सिंचनाद्वारे पाणी द्यावे लागत आहे. निफाड तालुक्यात शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी तुषार सिंचनाचा आधार घ्यावा लागत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Due to heavy rains, farmers have to irrigate crops through frost irrigation.
Grain Distribution Scam: उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्र्यांचे आदेश रद्द! कथित धान्यवाटप घोटाळा प्रकरण

ज्या शेतकऱ्यांनी दोन ते तीन एकरवर सोयाबीनची पेरणी केली आहे. ते खटपट करून कसेबसे क्षेत्र भिजवत आहे.

मात्र, ज्यांनी दहा ते पंधरा एकरवर सोयाबीनची पेरणी केली. त्यांना कोणत्या क्षेत्राला पाणी द्यावे आणि कोणते ठेवावे, अशा प्रश्‍न निर्माण झाल्याने मोठ्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.

"शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे अगोदरच बळीराजा संकटात आहे. त्यातच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे .पिकांचे नुकसान होण्याची आपत्ती ओढावली आहे." -माधवराव ढोमसे (माजी संचालक, बाजार समिती, पिंपळगाव बसवंत)

"पावसाने ओढ दिल्याने निफाड तालुक्यातील खरिपातील सोयाबीन, मका धोक्यात आला आहे. उत्पादन घटू नये म्हणून शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर क्षेत्र भिजवावे. शक्य असेल त्या शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाचा वापर करावा."

-सुधाकर पवार (तालुका कृषी अधिकारी, निफाड)

Due to heavy rains, farmers have to irrigate crops through frost irrigation.
Lumpy Disease: राज्यात जनावरांचे 60 टक्के लसीकरण! महिनाअखेर मोहीम पूर्ण होण्याबाबत प्रश्नचिन्ह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.