पळसन (जि. नाशिक) : पिंपळसोंड पैकी उंबरपाडा तातापाणी (गरम पाण्याचे झरे) येथील साखळचोंड धबधब्यावरुन पाय घसरुन पंधरा फूटावरुन खडकावर आदळून पर्यटक विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (ता. २३) घडली. या घटनेमुळे येथील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (student from Surat died after falling from Sakhalchond falls Nashik Latest Marathi News)
याबाबत माहिती अशी की, सुरत येथील सार्वजनिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारा युवक तक्षिल संजाभाई प्रजापती (वय १८) हा दहा ते बारा मित्रांसमवेत पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे सहलीसाठी आला होता. दुपारी एक ते दीडच्या सुमारास हे सर्वजण उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड येथील वाहूटचोंड शॉवर पॉईटच्या धबधब्यावर अंघोळ करीत होते. या वेळी खडकावर
शेवाळ असल्याने पाय घसरुन पंधराफूट खाली खडकावर आपटल्याने तक्षिलच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत आदिवासी बचाव अभियानाचे कार्यकर्ते रतन चौधरी यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक संदीप कोळी, नितीन ढेपले, वनरक्षक कर्मचारी अविनाश छगने, वामन पवार यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पाचच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी नारायण गावित, माजी सैनिक शिवराम चौधरी, साधु गावित, अनिल बागूल, रामदास गावित, सुरेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले.
हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
"याठिकाणी सहा साखळी धबधब्यांची मालिका आहे. हा भाग गुजरात सीमेलगतचा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. वनविभागाने कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत. तत्कालीन उंबरठाण येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे यांनी दोनवेळा धबधब्याची पाहणी केली होती. आराखडा तयार करून सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांची परजिल्ह्यात बदली झाल्यानंतर हा विषय मागे पडला."
- शिवराम चौधरी, माजी सैनिक, पिंपळसोंड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.